Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिल्लिया महाविद्यालयात मतदार जनजागृती व नवमतदार नोंदणी अभियान

बीड प्रतिनिधी - येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व निवडणूक विभाग,तह

मुंबईमध्ये सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
कोपरगावचा सोमवारचा आठवडे बाजार बंद ः मुख्याधिकारी जगताप
काढलेले पेव्हिंग ब्लॉक पुन्हा बसवा ः सरफराज पठाण

बीड प्रतिनिधी – येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व निवडणूक विभाग,तहसील कार्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2023 शनिवार रोजी नव मतदार जनजागृती व नोंदणी अभियान कार्यक्रम घेण्यात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शौकततुल्ला हुसैनी, मार्गदर्शक डॉ. शेख गफूर अहमद, राज्यशास्त्रविभाग प्रमुख तथा निवडणूक साक्षरता मंचचे नोडल अधिकारी डॉ. मोहम्मद खय्यूम फारुकी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शेख रफीक यांची उपस्थिती होती.
डॉ. शेख गफूर अहमद यांनी लोकशाहीचे महत्त्व स्पष्ट करताना लोकशाही निवडणुकीमार्फत जिवंत राहते. त्यामुळे सर्वांनी आपला राजकीय हक्क व सुजान नागरिकत्वाचे उत्तरदायित्व  स्वीकारण्यासाठी मतदार यादी मध्ये नाव नोंदवावे व निवडणुकीत मतदान करावे. नवमतदारांना वर्षातून चार टप्प्यांत आपली नाव नोंदणी करता येते. त्यासाठी वोटर हेल्पलाईन (तेींशी कशश्रश्रिळपश) या पद्वारे स्वतःही नाव नोंदणी करू शकता असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख तथा निवडणूक साक्षरता मंचचे नोडल अधिकारी डॉ. मोहम्मद खय्यूम फारुकी यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदवून लोकशाही बळकट करण्यासाठी आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. शौकततुल्ला हुसेनी यांनी सांगितले की आपण ऑनलाईन पद्धतीने देखील मतदार यादी मध्ये आपले नाव नोंदवू शकतो व सशक्त लोकशाहीचा आधारस्तंभ होऊ शकतो, मतदार हा लोकशाहीत राजा असतो,  त्यासाठी नवमतदाराने पुढाकार घेऊन आपले तसेच घरातील अठरा वर्षे पूर्ण करणार्‍याची नाव नोंदवावे. यावेळी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर मिर्झा असद बेग, डॉ.शेख एजाज परवीन, डॉ. आसेफ एकबाल, प्राध्यापक वृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागप्रमुख तथा निवडणूक साक्षरता मंचचे नोडल अधिकारी डॉ. मोहम्मद खय्यूम फारुकी यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शेख रफीक यांनी व्यक्त केले.  कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद ईलयास फाजील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

COMMENTS