Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मते द्या, अन्यथा पैसे खात्यातून काढून घेणार

लाडकी बहीण योजनेवरून आमदार रवी राणा यांचे वक्तव्य

अमरावती ः राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी आमदार रवी राणा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. आमचे सरक

उपमुख्यमंत्री जेव्हा बॉम्ब फोडतील तेव्हा उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जेल मध्ये असतील – आ. रवी राणा 
आरती सिंग यांचा रवी राणांवर पलटवार
महिलेचा आदर करणाऱ्या बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरेंकडून महिलेचा अपमान

अमरावती ः राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी आमदार रवी राणा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये आम्ही दुप्पट म्हणजे 3000 रुपये करू. मात्र त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही, अशांच्या खात्यातून दीड हजार रुपये वापस घेऊ, असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले आहे. अमरावतीमध्ये आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
रवी राणा यांच्या या वक्त्यामुळे राज्यात आता चांगलीच चर्चा रंगली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. तेव्हापासूनच या योजनेची चर्चा राज्यभर सुरू आहे. मात्र, आता याच योजनेवरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रवी राणा यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार पलटवार केला आहे. महाराष्ट्रातील बहिणींना दिले जाणारे पैसे हे तुमच्या घरचे आहेत का? असा प्रश्‍न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. हा राज्य सरकारचा पैसा आहे, आणि केवळ दीड हजार रुपयात महाराष्ट्रातील महिला भगिनी त्यांचे मत विकतील का? असा सवालही त्यांनी उपस्थित होत आहे.

COMMENTS