Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विवेक कोल्हे यांची को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी निवड

कोपरगाव प्रतिनिधी ः सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक बिपीनदादा कोल्हे यांची

करंजीत अखंड हरीनाम सप्ताहाची जल्लोषात सांगता
रेल्वे हमाल-माथाडींच्या मेळाव्यात एकजुटीतून संघर्षाचा नारा
Ahmednagar : भाजपचा नेता आमदार रोहित पवारांच्या गोटात..राम शिंदेंना जोरदार झटका I LOK News24

कोपरगाव प्रतिनिधी ः सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक बिपीनदादा कोल्हे यांची को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालकपदी नुकतीच निवड झाली आहे त्याबददल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
              सुरवातीस राज्यात वीजेचा तुटवडा मोठया प्रमाणात जाणवत असतांना सहकारी साखर कारखान्यांनी उसाच्या चिपाडापासून वीज निर्मीतीचे प्रकल्प हाती घ्यावे व राज्याला वीजेचा पुरवठा करावा यासाठी केंद्र व राज्य शासनाने सहकार्य केले होते त्यातून माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत 12 मे वॅट सहवीज निर्मीतीचा प्रकल्प साकारला होता. हा प्रकल्प साकारत असतांना व पुर्ण झाल्यानंतर त्यात येणा-या अडी अडचणी सोडविण्यासाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून विविध सुधारणा घडवून आणल्या होत्या. को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या संचालकपदासाठी राज्यस्तरावर नुकतीच निवडणुकीची प्रक्रिया पार पडली त्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे अभ्यासू व्यक्तीमत्व तथा युवा अध्यक्ष विवेक बिपीनदादा कोल्हे यांची सर्वानुमते निवड झाल्याची माहिती को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने देण्यांत आली. निवडीनंतर विवेक कोल्हे म्हणाले की, येणारा काळ हा स्पर्धेचा आहे. त्यात सहकारी साखर कारखाने, त्यांचे विविध उपपदार्थ तसेच औषधी प्रकल्प त्याचबरोबर सहवीज निर्मीतीचे प्रकल्प त्यात उदभवणा-या अडी अडचणींची सोडवणुक सुरळीतपणे होण्यासाठी यापदाच्या माध्यमांतुन जाणिवपुर्वक प्रयत्न करू व यासाठी असोसिएशनच्या माध्यमांतून केंद्र व राज्यस्तरावर साखर कारखान्यांच्या सहवीज निर्मीती प्रकल्प अधिकाधिक यशस्वीतेसाठी काम करू. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याची प्रेरणा, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहु असेही ते शेवटी म्हणाले.

COMMENTS