Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट सर्वांनी पाहावा ः विवेक कोल्हे

कोपरगाव शहर ः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट सर्वांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा आह

नवरात्रोत्सवातच नव्हे तर वर्षभर स्त्रीशक्तीचा आदर करा ः विवेक कोल्हे
नागरिकांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन
मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज ः विवेक कोल्हे

कोपरगाव शहर ः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट सर्वांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा आहे. एकसंघ राष्ट्र विचारधारेचे नागरिक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंच यांचे माध्यमातून जमलेल्या समर्पणातून आयोजित केलेला चित्रपट प्रदर्शनाचा प्रयोग कौतुकास्पद असल्याचे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांनी काढले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचारमंच, सावरकर प्रेमी नागरिक यांनी स्वच्छतादूत सुशांत घोडके यांच्या समर्पण शो या कल्पनेला साथ देत स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन सुदेश पिक्चर पॅलेस येथे करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंच चे माध्यमातून समर्पण पेटी ठेवण्यात आली असून एका व्यक्तीने चित्रपट बघितल्यावर त्याने किमान एक-दोन व्यक्तींना तिकीट काढून चित्रपट दाखवण्याची कल्पना आहे. या कल्पनेतून पहिल्याच दिवशी सुमारे 145 नागरिकांनी सहभाग घेतला आहे.  या प्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे, बी. एस. एन. एल. चे संचालक अ‍ॅड. रविकाका बोरावके, वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंतराव जोशी, साई संजीवनी बॅकेचे चेअरमन शरदनाना थोरात, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिलीपराव घोडके,माजी सैनिक मारुती कोपरे, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, जय तुळजाभवानी मंडळाचे अध्यक्ष दत्ता काले, माजी नगराध्यक्ष दिलीपराव दारुणकर, यांचे सह शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील नागरिक ,महिला,सावरकर प्रेमी उपस्थित होते.  सुरुवातीला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थितांचे शुभहस्ते करण्यात आले. ज्येष्ठ स्वयंसेवक मुकुंद कालकुंद्री यांनी बलसागर भारत होवो हे पद्य गायन केले. चित्रपट सांगता झालेवर सर्वांनी उभे राहून स्वातंत्र्यवीरांना श्रध्दांजली अर्पण करत उदय रोकडे यांचे समवेत सामुदायिक प्रार्थना झाली. सुत्रसंचालन स्वच्छतादूत सुशांत घोडके, योग शिक्षिका वृंदा को-हाळकर यांनी केले.

COMMENTS