Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्याचे माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांची आशियाना निवासस्थानी भेट

लातूर प्रतिनिधी - राज्याचे माजी आरोग्य मंत्री अंबडचे आमदार राजेश टोपे हे लातूर दौ-यावर शनिवारी आले असता त्यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यां

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर शाईफेक
लोकसभेसाठी पाच जागा द्या, अन्यथा सर्व पर्याय खुले
नांदेड जिल्ह्यात 47 मिमी पावसाची नोंद; ओढे, नाल्यांना पूर

लातूर प्रतिनिधी – राज्याचे माजी आरोग्य मंत्री अंबडचे आमदार राजेश टोपे हे लातूर दौ-यावर शनिवारी आले असता त्यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख व माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांच्यात विविध विषयावर चर्चा केली. याप्रसंगी देशमुख परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार विक्रम काळे आमदार संजय बनसोडे उपस्थित होते.
याप्रसंगी माजी आमदार अ‍ॅड त्रिंबक भिसे, साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, दिलीप माने, रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज सिरसाठ, काँग्रेस मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष प्रशांत पाटील, रेणाचे संचालक संभाजी रेड्डी, संभाजी सुळ, सतिष पाटील, बाळासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS