Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्मवीरांच्या अभिवादनाचा विश्‍वलक्ष्मी प्रतिष्ठानचा उपक्रम कौतुकास्पद

माजी तहसिलदार गुलाबराव पादीर यांचे प्रतिपादन

श्रीरामपूर ः रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानने आयोजि

पंढरपूर पोटनिवडणुकीत दोन्ही बाजुने पाण्यासारखा पैसा वाहणार : राजू शेट्टी
राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या महिला मेळाव्यात अंधांनी दिला सक्षमतेचा नारा
कोकमठाण मध्ये समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाचे थेट प्रेक्षपण

श्रीरामपूर ः रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानने आयोजित केलेले सेवाभावी पुरस्कार आणि इतर उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत माजी तहसिलदार गुलाबराव पादीर यांनी व्यक्त केले
  येथील बोरावकेनगर मधील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे स्व. नामदेवराव विश्‍वनाथ सुकळे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ सामाजिक सेवा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्रा. शिवाजीराव बारगळ यांना स्व. नामदेवराव विश्‍वनाथ सुकळे स्मृतीप्रीत्यर्थ सामाजिक सेवा पुरस्कार, रयत शिक्षण संस्थेचे डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालयास महाराष्ट्र शासनाचा तीन लाखाचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा पुरस्कारनिमित्त मुख्याध्यापक सुनील साळवे, गुरुकुल प्रमुख कांतिलाल शिंदे यांचा सन्मान, भोकरच्या सर्वसामान्य शेतकरी परिवारातील व बोरावके महाविद्यालयाच्या कु.अश्‍विनी पोपटराव काळे या विद्यार्थिनीची अलिबाग येथे एमबीबीएस वैद्यकीय परीक्षेसाठी निवड झाली, तिने नीट परीक्षेत647 गुण मिळविले या सर्वांना प्रतिष्ठानतर्फे सन्मानपत्र, गौरवचिन्ह, शाल, बुके, पुस्तके , भेटवस्तू देऊन  मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक गौरविण्यात आले. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून गुलाबराव पादीर बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. यावेळी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजीव शिंदे,सौ.अरुणा बारगळ, मिराताई पादीर, कस्तुरबाई सुकळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रतिष्ठान संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून मान्यवरांचे सत्कार केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, समन्वयक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन कवयित्री संगीता फासाटे, कटारे यांनी केले. यावेळी डॉ. राजीव शिंदे, प्राचार्य डॉ. गोरख बारहाते, डॉ. वसंतराव जमधडे, मुख्याध्यापक सुनील साळवे यांनी मनोगत व्यक्त केले गुलाबराव पादीर यांनी श्रीरामपूर शहराची पार्श्‍वभूमी सांगून विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान, वाचन संस्कृती प्रतिष्ठान, ज्येष्ठ आनंद मेळावा, साहित्य प्रबोधन मंच, विचार जागर मंच आणि मान्यवर सेवाभावी संस्था व्यक्ती हे शहराचे भूषण आहेत. सुकळेसर हे कुणाची देणगी न घेता आपल्या अल्पस्वल्प पेन्शनमधील रक्कम वापरून असे सेवाभावी उपक्रम राबवितात हे विशेष उल्लेखनीय आहेत. प्राचार्य टी. ई. शेळके यांनी अध्यक्षीय भाषणातून कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. अण्णासाहेब शिंदे, अ‍ॅड, रावसाहेब शिंदे आदिंचे शैक्षणिक योगदान सांगून सुकळेसर यांनी सेवानिवृत्ती नंतरही कर्मवीरांनी सांगितलेला सेवाभाव जपला आहे. प्रा.बारगळ, मुख्याध्यापक सुनील साळवे, कु. अश्‍विनी काळे यांचा उचित, प्रेरणादायी सत्मान झाला असल्याचे सांगितले.प्राचार्य डॉ. बाळासाहेब बावके, प्रा. रमेश चौधरी, डॉ. प्रकाश मेहकरकर, मुख्याध्यापक भागवत मुठे, लिंगायत समाज अध्यक्ष निकडे, सुरेश गड्डेगुरुजी, राजेंद्र बारगळ, योगेश माकोणे, आनंदकुमार आरोटे, लहानू रहाणे, सदाशिव गोसावी, गणेश सुकळे, सार्थक सुकळे, सुरेखा बुरकुले संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले, सौ.मोहिनी काळे, प्रा.कु.हर्षला बारगळ, आशालता कल्याणकर, बोरकर, बाळासाहेब बुरकुले, सतिश गवळी, पुंडलिक खैरनार, आबा साळुंखे, देवराम शिंदे, लक्ष्मण भंडारी, प्रसन्न धुमाळ, विष्णू भगत, रावसाहेब भिंगारदिवे, पोपटराव काळे, बाबासाहेब चेडे आदी उपस्थित होते. अनेक व्यक्ती, संस्था, संघटनेतर्फे प्रा. शिवाजीराव बारगळ, सौ.अरुणा बारगळ यांचे सत्कार झाले. प्रा. बारगळ यांनी माझा झालेला हा सत्कार लाखमोलाचा असून आता अधिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. शिवाजी काळे, संगीता फासाटे यांनी करून आभार मानले.

COMMENTS