Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आत्मा मालिकचा विश्‍वजीत देवकर देशात प्रथम

कोपरगाव शहर ः सिल्वर झोन ओलंपियाड फाउंडेशन आयोजित आंतरराष्ट्रीय तर्क आणि अभियोग्यता ओलंपियाड या परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुला

शुटींगबाँल स्पर्धेत मुलींच्या गटातुन अमरावतीने, मुलांमध्ये नाशिक विभागाने मैदान मारले
पारनेरच्या महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा; आमदार निलेश लंकेकडे रोख
अहमदनगर जिल्ह्यातील 96 महसुली मंडळाचा दुष्काळी गावांमध्ये समावेश

कोपरगाव शहर ः सिल्वर झोन ओलंपियाड फाउंडेशन आयोजित आंतरराष्ट्रीय तर्क आणि अभियोग्यता ओलंपियाड या परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांनी देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. ही परीक्षा इयत्ता दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. या ओलंपियाड परीक्षेवर सीबीएससी व स्टेट बोर्ड इंग्रजी माध्यम या माध्यमाच्या शाळांचे वर्चस्व असतते परंतु आत्मा मालिक माध्यमिक गुरुकुलाच्या सेमी इंग्लिश मीडियम च्या विद्यार्थ्याने या सर्व गोष्टीवर मात करत देशात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे.
झोनल टॉपर दोन विद्यार्थी, गोड मेडल तीन विद्यार्थी, सिल्वर मेडल तीन विद्यार्थी, ब्राँझ  मेडल तेरा  विद्यार्थी, विशेष प्राविण्य प्राप्त 39 विद्यार्थी, ऑल इंडिया रँक 50-71 विद्यार्थी असे एकूण 59 विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. असे प्राचार्य निरंजन डांगे सर यांनी सांगितले. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये देशात प्रथम क्रमांक देवकर विश्‍वजीत, झोनल टॉपर (चार राज्य मधून) तृतीय क्रमांक नलावडे श्रेयश व पुरकर सुरज. गोल्ड मेडल प्राप्त नागरगोजे पृथ्वीराज, ढोरकुले ओम, लोखंडे अविराज. सिल्वर मेडल प्राप्त इंगोले श्रीतेज, टकले पुष्पराज, मोरे हर्षद. ब्रांच मेडल प्राप्त शिंदे शंतनू, कारंडे ऋतुराज, लगड अनुभव, बागुल नयन, हासे यश, जाधव रितेश, पालवे सुदर्शन, पाटील केतन, जेजुरकर सोहम, शिंदे अभिनव, थोरात मल्हार, विशेष प्राविण्य प्राप्त शिंदे तनिष्क, हुले अदिती, सोनवणे ईश्‍वर, आहेर अथर्व, बोडके श्रावण, चव्हाण कृष्णा, ढवळे साई, नलावडे भूषण, निकम आदित्य, पाटील पुष्पराज, पवार विपुल, टेंगळे छत्रसाल, शिंदे सुयश, उंडे हर्षवर्धन, जोर्वेकर तन्मय, हसे राज, बादाडे प्रणव, घोगरे प्रसाद, भवर श्रेयश, राजपूत उत्कर्ष, बोडके कार्तिक, झिंजुर्के श्रीनाथ, लटपटे समीक्षा, महामीने अर्चित, राऊत श्रद्धा, सोनवणे यश, कदम तन्मय, नहीरे  मयंक, नवले ऋग्वेद, त्र्यंबके विश्‍वजीत, पाटील चैतन्य, पाटील धीरज, पगारे सिद्धार्थ, लोहकने वरद, जपे संगम निकम विवेक, मोहिते अभय, रोकडे तन्मय, पाटील पियुष या विद्यार्थांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे सर विभाग प्रमुख सचिन डांगे अथर्व फाउंडेशनचे नंदकिशोर भाटे राहुल मिश्रा, शिवम तिवारी यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वीविद्या विद्यार्थ्याचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, विश्‍वस्त प्रकाशभट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, शालेय व्यवस्थापक,  सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदीनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS