Homeताज्या बातम्यादेश

चालत्या ट्रेनमधून लोकांवर बेल्टने हिंसक हल्ला

हजारो लाखो लोक ट्रेनने रोज प्रवास करतात. प्रवासादरम्यान रोज काहीतरी नवीन गोष्टी पहायला मिळतात. आत्तापर्यंत ट्रेनमधील एकापेक्षा एक विचित्र प्रकार,

शरद पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी
सौ.के.एस.के. महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी
नव्या शैक्षणिक धोरणाची उपयुक्तता

हजारो लाखो लोक ट्रेनने रोज प्रवास करतात. प्रवासादरम्यान रोज काहीतरी नवीन गोष्टी पहायला मिळतात. आत्तापर्यंत ट्रेनमधील एकापेक्षा एक विचित्र प्रकार, त्यांचे फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. दिवसेंदिवस यामध्ये भर पडत चालली आहे. सध्या व्हायरल होत असलेला आणि चर्चेत आलेला व्हिडीओ खूपच धक्कादायक आहे. एक तरुण ट्रेनमधून बाहेर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तींना बेल्टने मारत आहे. हे प्रकरण काय आहे याविषयी जाणून घेऊया. व्हारल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, चालत्या ट्रेनच्या दारात एक तरुण उभा आहे. तरुण रेल्वेच्या दारात उभा राहून बाहेर प्लॅटफॉर्म वरील लोकांना बेल्टने मारत आहे. खूपच धक्कादायक दृश्य व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. ट्रेनमधील एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला आहे. लोक भितीमुळे त्याला थांबवण्याचाही प्रयत्न करत नसल्याचं व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे.

COMMENTS