Homeताज्या बातम्यादेश

उत्तराखंडमध्ये हिंसाचाराचा आगडोंब

सहा जणांचा मृत्यू ; 150 पोलिसांसह 250 जण जखमी

डेहराडून ः उत्तराखंड राज्यातील हलद्वानी जिल्ह्यातील बनभुलपुरा भागात मलिक बागेजवळ एका अनधिकृत मदरशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचार

अंबाजोगाई शहरात जंतूनाशक औषधी धुराच्या फवारणी करा-संजय गंभीरे
चालता- चालता तरुणाला आला हार्ट अटॅक
अहमदनगर : शहरातील रस्त्यांचे खड्डे प्रकरण थेट कोर्टात

डेहराडून ः उत्तराखंड राज्यातील हलद्वानी जिल्ह्यातील बनभुलपुरा भागात मलिक बागेजवळ एका अनधिकृत मदरशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचार्‍यांवर, पोलिसांवर आणि या घटनेचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर दगडफेक झाल्याची घटना घडली असून, या हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक पोलिस जखमी झाले आहेत.
या जिल्ह्यात पोलिस बंदोबस्तात अनधिकृत मदरसा जमीनदोस्त करण्यात आला. त्यानंतर जमाव आणखी आक्रमक झाला. या जमावाने पोलिस, महापालिका आणि प्रसारमाध्यमांच्या गाड्या पेटवल्या. जमावाकडून दगडफेक सुरू असताना त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अ्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तरीदेखील जमावाकडून दगडफेक आणि जाळपोळ सुरूच होती. अखेर पोलिसांना अधिक बळाचा वापर करावा लागला. परंतु, तोवर बनभुलपूरा भागात मोठा हिंसाचार उसळला. या घटनेला 20 तास उलटले तरी बनभुलपूरा भागात हिंसाचार चालू आहे. अशातच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी बनभुलपुरा भागात संचारबंदी लागू केली आहे. या भागात अधिक पोलीस कुमक बोलावण्यात आली आहे. तरीदेखील काही ठिकाणी हिंसाचार चालू आहे. दरम्यान, दगडफेकीच्या घटनेत शहर दंडाधिकारी ऋचा सिंह, रामनगरच्या कोतवालांसह 250 हून अधिक पोलीस, शासकीय अधिकारी आणि पत्रकार जखमी झाले आहेत. समाजकंटकांनी बनभुलपुरा पोलिस ठाण्याला आग लावली आहे. दंगलखोरांनी पोलिसांची वाहने, जेसीबी आणि अग्निशमन दलाची वाहनेदेखील पेटवली आहेत. आतापर्यंत या दंगलीत 60 हून अधिक वाहनं जाळली गेली आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, लाठीचार्ज केला, हवेत गोळीबार केला तरीदेखील ही दंगल थांबलेली नाही. जमावाने हल्ला केल्यानंतर सर्वप्रथम शासकीय अधिकार्‍यांनी तिथून पळून काढला. त्यापाठोपाठ पोलिसांनी महापालिका अधिकार्‍यांना तिथून बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. तसेच जमाव नियंत्रणात येत नाही हे लक्षात आल्यावर अधिक पोलीस कुमक मागवण्यात आली. आतापर्यंत या दंगलीत पिता-पुत्रासह सहा जणांचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. तर 200 हून अधिक पोलीस, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार आणि सामान्य नागरिक जखमी झाले आहेत.

COMMENTS