Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरमध्ये हिंसाचाराचा भडका

दहशतवादी हल्ल्यात जवानाला वीरमरण

इम्फाळ ः मणिपूर राज्यामध्ये हिंसाचाराचा भडका उडाला आहे. पुन्हा एकदा कुकी अतिरेक्यांनी डोके वर काढले असून, बुधवारी या राज्यामध्ये कुकी अतिरेकी आणि

शाहीर एकनाथ सरोदे यांना राष्ट्रीय साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार
VIRAL VIDEO: भाऊंनी PPE किट घालून वरात गाजवली | पहा Lok News24*
सामाजिक अस्थिरतेतून जागतिक मंदी !

इम्फाळ ः मणिपूर राज्यामध्ये हिंसाचाराचा भडका उडाला आहे. पुन्हा एकदा कुकी अतिरेक्यांनी डोके वर काढले असून, बुधवारी या राज्यामध्ये कुकी अतिरेकी आणि पोलिसांमध्ये गोळीबार झाला. ज्यामध्ये एक कमांडो मारला गेला. टेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह या सीमावर्ती शहरात सुरक्षा दल आणि संशयित कुकी दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एका पोलीस कमांडोचा मृत्यू झाला आहे. पोलिस कर्मचार्‍याला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. सध्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संशयित कुकी अतिरेक्यांनी एसबीआय मोरेह शहराजवळील सुरक्षा चौकीवर बॉम्ब फेकले आणि गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलाने ही कारवाई केली आहे. डब्ल्यू सोमोरजीत असं मृताचे नाव आहे. तर आणखी एक कमांडो जखमी झाला आहे. वॉर्ड 7 जवळ दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. हा गोळीबार एक तासाहून अधिक काळ सुरू होता. मोरेह येथील पोलीस अधिकार्‍याच्या हत्येप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली होती. मणिपूर सरकारने शांततेचा भंग, सार्वजनिक शांतता बिघडवणे आणि तेंगनौपालच्या महसूल प्राधिकरण क्षेत्रात मानवी जीवन आणि मालमत्तेला गंभीर धोका निर्माण होण्याच्या भीतीने जिल्ह्यात संपूर्ण कर्फ्यू लागू केला आहे. या कर्फ्यू दरम्यान जीवनावश्यक वस्तू उपलब्ध राहणार आहेत. स्थानिक पोलिसांनी फिलिप खोंगसाई आणि हेमोखोलाल माटे यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एसडीपीओ सीएच आनंद यांच्या हत्येप्रकरणी अटक केली होती. या दोघांनी सुरक्षा कर्मचार्‍यांच्या वाहनांवर गोळीबार केला होता, त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. मणिपूरमध्ये सुरक्षा दल आणि कुकी दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन संशयितांना अटक केल्यानंतर 48 तासांनंतर पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. यात एक जवानही शहीद झाला आहे. मणिपूर सरकारने 16 जानेवारी रोजी सकाळी 12 वाजल्यापासून संपूर्ण कर्फ्यू लागू केलाय. कायदा व सुव्यवस्थेसोबतच अत्यावश्यक सरकारी कर्तव्यांवर तैनात असलेल्या एजन्सीसाठी कर्फ्यू शिथिल करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

COMMENTS