Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मढी येथील मुस्लिम समाजाला संरक्षण मिळावे : ग्रामस्थांची मागणी

नगर (प्रतिनिधी)- मढी ग्रामपंचायत मध्ये २२ फेब्रुवारी २०२५ रोजी घरकुल यादीचे प्रमाणपत्र वाटपासाठी दवंडी देऊन ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. सदर

ऑक्सिजन देणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी लोकचळवळ निर्माण व्हावी :- फिरोजभाई पठाण
बाफना पॉलिमर्सने नेले जामखेडचे नाव जागतिक पातळीवर
अहमदनगरच्या उड्डापुलाचे उद्घाटन करण्याची घाई कशासाठी ?

नगर (प्रतिनिधी)- मढी ग्रामपंचायत मध्ये २२ फेब्रुवारी २०२५ रोजी घरकुल यादीचे प्रमाणपत्र वाटपासाठी दवंडी देऊन ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. सदरील घरकुलाचा विषय संपल्यावर ग्रामसभा संपली असे जाहीर केले. परंतु सरपंच व ग्रामसेवकांनी कुठलीही गावकऱ्यांना कल्पना न देता मुस्लिम समाजाच्या विरोधात येणाऱ्या यात्रेमध्ये दि. १९ मार्च २०२५ रोजी मढी यात्रा भरणार असून त्या यात्रेमध्ये मुस्लिम समाजाला बंदी घालण्यात आली असून मुस्लिम समाज अवैद्य धंदे करतात व प्रथा पाळत नाही असा चुकीचा उल्लेख केला हा ठराव ग्रामपंचायत मध्ये मंजूर करून घेतला तरी संविधानाच्या विरोधात हा ठराव घेण्यात आलेला आहे. तरी सरपंचांनी मढी गावांमधील जातीय तणाव वाढवण्याच्या चुकीच्या बातम्या पसरवण्यात आल्या यानंतर समस्त मुस्लिम समाजाने गटविकास अधिकारी यांना अर्ज देऊन त्याबाबतची चौकशी मागवल्या नंतर चौकशी दरम्यान शासकीय कर्मचारी ग्रामसेवक यांच्यावर हा बेकायदेशीर ठराव असल्याची कारवाई केली असून तो ठराव देखील रद्द करण्यात आला आहे. यानंतर हा मुद्दा बदलून मढी गावाचे सरपंच संजय बाजीराव मरकड राजकीय पातळीवर बाहेरून राजकीय नेते व विविध संघटनेचे अध्यक्ष त्यांना मढी गावांमध्ये आमंत्रित करून समस्त मुस्लिम समाजाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी व जाती-जाती मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी १ मार्च २०२५ रोजी सभा बोलवण्यात आली असून या सभे  मढीमध्ये मुस्लिम समाजाविरोधात चितावणीखोर भाषणे, दंगली घडवण्याचा प्रयत्न असल्याचा या सर्व बाबी पाहता या होणाऱ्या कृत्यापासून मुस्लिम समाज भयभीत असून या विषयाची दखल घेऊन मढी येथील मुस्लिम समाजाच्या सुरक्षेसाठी संरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

COMMENTS