कोपरगाव शहर : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक ज्ञानेश्वर सुर्वे यांना त्याच गावातील गायकवाड कुटुंबियांनी
कोपरगाव शहर : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक ज्ञानेश्वर सुर्वे यांना त्याच गावातील गायकवाड कुटुंबियांनी शुल्लक कारणावरून जबरी मारहाण करत जखमी केले असून ग्रामसेवक सुर्वे हे सध्या कोपरगावातील संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहर पोलिस स्टेशन मध्ये ग्रामसेवक फिर्यादी ज्ञानेश्वर देवराम सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवार 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 4।30 वाजण्याच्या सुमारास मी माझ्या ग्रामपंचायत कार्यालयात सरकारी काम करत असताना महेश विजय गायकवाड, श्रीकांत विजय गायकवाड, विजय गायकवाड व महेश गायकवाड यांची आई हे कार्यालयात आले व आमची वारस हक्काची नोंद का करत नाही अशी विचारणा केली असता मी त्यांना सांगितले की, तुम्ही कोर्टातून कागदपत्रे बनवून आणा मी तुमची वारसाच्या प्रॉपर्टीची नोंद लावतो असे सांगितल्याचा राग येऊन लगेच आरोपी महेश विजय गायकवाड यांने हातात दगड घेऊन माझ्या डोक्यात मारला व मला शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये वरील चारही आरोपी विरुद्ध सरकारी कामात अडथळा करत दगडाने मारहाण करत दुखापत करणे याप्रमाणे 468/2024 भारतीय न्याय संहिता कलम 132/118 (2) 115,352,351 (2) 3 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पवार हे करत आहे.
कारवाईची मागणी
या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने सदर गावच्या ग्रामसेवकास मारहाण करत प्राणघातक हल्ला करणार्या तसेच सरकारी कामात अडथळा आणणार्या लोकांना अटक करत त्यांच्यावर भा.द. वि. स कलम 109 जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, 132 सरकारी कामात अडथळा आणणे, 118 (1) इच्छापूर्वक दुखापत करणे, 352 शिवीगाळ करणे, 351 (2) (3) कलम 326 जीवे ठार मारण्याची धमकी आदी कलमातर्गत गुन्हे दाखल करावे तसेच ज्ञानेश्वर सुर्वे यांच्याकडे असलेल्या कोकमठाण ग्रामपंचायतीचा कारभार काढून घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील राजपूत व जिल्हा सचिव शशिकांत नरोडे यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शहर पोलिस निरीक्षक यांना निवेदन पाठवत केली आहे.
COMMENTS