मुंबई : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर मंगळवारी निवडणुकीची अधिसूचना जाहीर होणार असून, त्यादिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होती. या

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर मंगळवारी निवडणुकीची अधिसूचना जाहीर होणार असून, त्यादिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होती. या निवडणुकीसाठी भाजपने आघाडी घेत रविवारी आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे 99 उमेदवारांची नावे जाहीर करून भाजपने आघाडी घेतल्याचे बोलले जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ असून या जिल्ह्यात महायुतीतील कोणत्या पक्ष कोणत्या जागेवर लढणार आहे, याचे अजूनही चित्र स्पष्ट नाही. मात्र भाजपने रविवारी सादर केलेल्या 99 जागांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये शिर्डीतून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तर शेवगावमधून मोनिका राजळे, राहुरीतून शिवाजी कर्डिले, श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुते, आणि कर्जत-जामखेडमधून प्रा. राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
COMMENTS