Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विजयसिंह मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश ठरला

मुंबई प्रतिनिधी - राज्यातील महायुतील जागा वाटपावरून मित्रपक्षांमध्ये कलगितुरा पाहायला मिळत आहे. एकीकडे जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांच

शरद पवार गटाकडून पर्यायी पक्षाचे नाव सादर
शरद पवार गटाला निवडणूक चिन्ह द्या
शरद पवार गटाच्या 10आमदारांना नोटीस

मुंबई प्रतिनिधी – राज्यातील महायुतील जागा वाटपावरून मित्रपक्षांमध्ये कलगितुरा पाहायला मिळत आहे. एकीकडे जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांचा धडाका सुरू असतानाच माढ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकरच्या उमेदवारीला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विरोध पाहायला मिळाला होता. निंबाळकर यांच्या विरोधात एक गट एकवटल्याचं पहायला मिळालं होतं. त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं असून येत्या चार दिवसात मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश होण्याचे जयसिंह मोहिते पाटील यांनी संकेत दिले आहे. विजयसिंह मोहिते पाटील कुटुंबीय राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असून धैर्यशील मोहिते पाटील पक्षाकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मोहिते पाटील उद्या शरद पवारांची भेट घेणार आहे. धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार पक्षाचे उमेदवार असतील. माढा , सोलापूर, बारामती मतदारसंघात आमच्या निर्णयाचा परिणाम दिसेल, असं जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS