Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विजय शिवतारे बारामती लोकसभा लढण्यावर ठाम

पुणे प्रतिनिधी - बारामतीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा न

फडणवीस होणार राज्याचे नवे कारभारी ?
‘बेस्ट’ बसचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबविणार :मुख्यमंत्री फडणवीस
गडकरींना धमकीप्रकरणी एनआयएचे छापे  

पुणे प्रतिनिधी – बारामतीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण विजय शिवतारे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. आपण माघार घेणार नसून, वेळ पडल्यास अपक्ष लढू असा निर्धार विजय शिवतारे यांनी व्यक्त केला आहे. पवार विरुद्ध बारामतीमधील सर्वसामान्य माणूस अशी ही निवडणूक असेल असंही विजय शिवतारे म्हणाले आहेत. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी नेते यांनी एकमताने ठराव पास केला असून विजय शिवतारे यांनी निवडणूक लढवावी असा निर्णय घेण्यात आला. दीड तास ही बैठक चालली होती अशी माहिती विजय शिवतारे यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नाही. देशातील एक मतदारसंघ असून, त्यावर कोणाची मालकी नाही. त्यामुळे स्वाभिमान जागरुक ठेवून लढलं पाहिजे असंही विजय शिवतारे म्हणाले आहेत. 

COMMENTS