Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यानिकेतन स्कूलचे जिल्हास्तरीय शूटिंग स्पर्धेमध्ये यश

इस्लामपूर / प्रतिनिधी : कासेगाव शिक्षण संस्थेचे विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचे जिल्हास्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश म

हिंगणीमध्ये विजेच्या धक्क्याने युवक ठार
भाजपचे विचार तळागाळा पर्यंत पोहचवणार : ना. सत्यपालसिंह बघेल
ग्रामीण भागाचा विकास झाल्यास जिल्ह्यासह राज्याचा विकास : ना. शंभूराज देसाई

इस्लामपूर / प्रतिनिधी : कासेगाव शिक्षण संस्थेचे विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचे जिल्हास्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश मिळवले. 25 व 26 सप्टेंबर रोजी विद्यामंदिर हायस्कूल इस्लामपूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये 14 वर्षे वयोगट मुलांमध्ये वीरेंद्र राहुल गिरीगोसावी एअर पिस्टल प्रथम क्रमांक व प्रतापसिंह जितेंद्र पाटील याने द्वितीय क्रमांक मिळविला. 14 वर्षे वयोगट मुलींमध्ये ध्रुवीता सतीश कुंभार हिने एअर पिस्टलमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. 17 वर्षे वयोगट मुलींमध्ये रायफल शूटिंग पीप साईट या क्रीडा प्रकारामध्ये शौर्या नितीन शिंदे हिने प्रथम क्रमांक मिळविला. चारही खेळाडूंची विभाग स्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये निवड झाली.
या चारही खेळाडूंचे कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर. डी. सावंत अधीक्षक ए. डी. पाटील स्कूलचे प्राचार्य अजित पाटील यांनी अभिनंदन केले. पर्यवेक्षक विजयकुमार शिंदे क्रीडा शिक्षक विकास ताटे व खेळाडूंचे पालक, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS