भारतासारख्या देशामध्ये राजकारण हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे राजकारण हा येथील जनतेचा भावनिक विषय आहे. खरंतर राजकारण हा विकासाचा एक
भारतासारख्या देशामध्ये राजकारण हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे राजकारण हा येथील जनतेचा भावनिक विषय आहे. खरंतर राजकारण हा विकासाचा एक राजमार्ग असून, या राजकारणाला किंवा नेत्यांकडे भावनिकदृष्टया बघू नये, ही समज इथल्या मतदारांना नाही. खरंतर भारतीय संविधान स्वीकृत केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला विभूतीपूजेचा मोठा धोका असल्याचे नमूद केले होते. कारण इथला मतदार, इथले कार्यकर्ते आपल्या नेत्यांची पायाशी लोळण घेण्यास तयार असतात, आपल्या लाडक्या नेत्यांसाठी काहीही करायला तयार होतात. त्याचे प्रमुख कारण म्हणजे या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांची विभूतीपूजा चालवल्याचे दिसून येते. त्या नेत्यांची भूमिका कितीही चुकीची असू दे, तो कितीही खोटं बोलत असून दे त्यांचा प्रत्येक शब्द झेलणारा कार्यकर्ता इथं दिसून येतो. खरंतर राजकीय नेत्यांच्या पायाशी लोळण घेण्याचे काहीच कारण नाही. वास्तविक पाहता राजकारण आणि विकास या दोन भिन्न बाबी आहेत. अमेरिकेसारख्या देशामध्ये देखील राजकारण होते, तेथे देखील खुले वाद-विवाद होतात. आपणच कसे सक्षम आहे, ते लोकांना पटवून द्यावे लागते, मात्र या राजकारणाच्या गोंधळात तिथला नागरिक जसा सजग आहे, तसा इथला मतदार नाही. याचे अनेक कारणे आहेत. प्रमुख कारण म्हणजे अमेरिका, फे्रंच या देशात जी क्रांती झाली ती लोकशाहीसाठी होती. त्यामुळे त्या देशाला लोकशाहीची किंमत आहे. त्यामुळे लोकशाही म्हणजे काय, आपल्या मतांचा योग्य कसा वापर करावा यांची त्यांना समज आहे. याउलट भारतासारख्या देशातील लढा हा स्वातंत्र्यासाठी होता, लोकशाहीसाठी नव्हता. त्यामुळे स्वातंत्र्याबरोबर आपल्याला लोकशाही ही आपसुकच मिळाली आहे. त्यामुळे लोकशाहीचे मोल आपल्याला अजूनही कळालेले नाही. खरंतर इथल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीला जसा एक मत एक मूल्याचा अधिकार आहे, तोच अधिकार इथल्या झोपडीत राहणार्या व्यक्तीला आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला इथली सत्ता उलथवून ठाकण्याचा अधिकार हा मतदानाद्वारे मिळाला आहे. मात्र त्याचा वापर अजूनही आपल्या विकासासाठी करता येत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे. खरंतर देशात अनेक राज्यांत विकासकामे न करताही अनेक आमदार, खासदार आपल्या चार-पाच, त्यापेक्षाही अनेक टर्म आमदार खासदार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राजकारण विकासाभिमूख पूरक असायला हवे. त्याचबरोबर निवडणुकीत मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी पुरेसे प्रयत्न करणे गरजेचे आहे. निवडणूकीमध्ये मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. एकूण लोकसंख्येमध्ये आजही अशिक्षित समाजाचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा मतदारांना निवडणूकीच्या कार्यक्रमाचे महत्व समजावून सांगून लोकशाही प्रक्रियेचे महत्व पटवून देणे आवश्यक आहे. त्यासाठी लोक शिक्षण-प्रौढ शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती करणे गरजेचे आहे. याशिवाय सामाजिक चालीरीती, रुढी परंपरा यामुळे मतदानाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष संवाद साधून या चालीरीती, परंपरा यातील दोष-उणीवा दूर करण्यासाठी हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. याशिवाय गरीब जनतेला आर्थिक मोह दाखवून मतदानाला प्रवृत्त केले जात आहे असेही दिसून आले आहे. यास्तव शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती करणे प्रामुख्याने गरजेचे आहे. लोकशाही व्यावस्थेमध्येच भयमुक्त व निःपक्षपाती वातावरणात निवडणूका पार पडणे अत्यंत महत्वाचे व आवश्यक आहे. भारतीय लोकशाहीला उज्वल परंपरा आहे. या दिनानिमित्ताने मतदारामध्ये जनजागृती व प्रबोधन होण्यास मोलाची मदत होईल. व भारतीय लोकशाही अधिक सक्षम, बळकट व लोकाभिमुख होईल. यासोबतच इथल्या मतदारांना लोकशाहीचे महत्व बिंबवण्याची खरी गरज आहे. इथला सुशिक्षित नागरिक देखील जेव्हा भावनिक राजकारणाचा बळी ठरतो, तेव्हा हा देश कुणाच्या हातात आहे? असा प्रश्न विचारावा वाटतो.
COMMENTS