Homeताज्या बातम्यामनोरंजन

साऊथ सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू यांचं निधन

साऊथ चित्रपटसृष्टीतून दु:खद बातमी समोर येते आहे. ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुंबईतील हवा ‘अत्यंत वाईट ’
ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीची तलवार नाचवत दहशत | LOKNews24
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार?

साऊथ चित्रपटसृष्टीतून दु:खद बातमी समोर येते आहे. ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात महिनाभराहून अधिक काळ त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालावली आणि त्याच्या अवयवांनी काम करणे बंद केले आणि दुपारी त्यांचं निधन झाल. दिग्गज अभिनेत्याच्या निधनाच्या बातमी आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना आणि मित्रांना धक्का बसलाय, दक्षिण इंडस्ट्रीतही शोककळा पसरली आहे. रिपोर्ट्सनुसार, सरथ यांच्या प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. याआधीही त्यांच्या निधनाची बातमी आली होती, मात्र कुटुंबीयांनी हे वृत्त फेटाळून लावले आणि सरथ बाबूंवर उपचार सुरू असून ते जिवंत असल्याचे सांगितले. त्यावेळी खोट्या बातम्या पसरवू नका, असे आवाहनही अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी केले होते. पण आज अखेर त्यांच्या प्राणज्योत मालवली आहे.

COMMENTS