Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शुक्र जन्मोत्सव व शिवपार्वती विवाह सोहळ्याचे सोमवारी आयोजन

कोपरगाव शहर ः संजीवनी मंत्राचे उगमस्थान असलेले पवित्र परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर जिथे शुभ कार्य करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मुहूर्त प

चोरीची मोपेड विकणारा अटकेत  
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शिवसेनाच्यावतीने अभिवादन
मनोज पाटील साहेब, बाळ बोठेच्या “त्या” पंटर पत्रकाराची चौकशी कधी करणार ?l LokNews24

कोपरगाव शहर ः संजीवनी मंत्राचे उगमस्थान असलेले पवित्र परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर जिथे शुभ कार्य करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा मुहूर्त पाहवा लागत नाही असे जगप्रसिद्ध असलेल्या एकमेव श्री क्षेत्र बेट देवस्थान मध्ये हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिन्यात येणार्‍या श्रावण शुद्ध अष्टमीला स्वाती नक्षत्रात म्हणजेच सोमवारी 12 ऑगस्ट रोजी भव्य दिव्य परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिवपार्वती विवाह सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने दिली आहे. याविषयी आयोजकांच्या वतीने अधिक माहिती देताना सांगितले की, सोमवार दि 12 ऑगस्ट रोजी कोपरगाव चे आमदार श्री व सौ आशुतोष काळे, हैदराबाद येथील शुक्रभक्त रविराज शेखर थानीकेल्ला तसेच साधुमंहत मान्यवरांची उपस्थितीत भव्य पालखी मिरवणूक  सकाळी 9 वाजेपासून सुरू होणार असून त्यानंतर विवाह सोहळा संपन्न होऊन उपस्थित सर्व भाविक भक्तांना शुक्राचार्य मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी या भव्यदिव्य सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सचिव संजीव कुलकर्णी,खजिनदार गजानन कोराळकर, सदस्य सुहास कुलकर्णी, हेमंत पटवर्धन, मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदिर प्रमुख प्रसाद पर्हे सदस्य संजय वडांगळे, आदिनाथ ढाकणे, अरुण जोशी, विशाल राऊत, बाळासाहेब लकारे, सुजित वरखेडे, विलास आव्हाड, दत्तात्रय सावंत, महेंद्र नाईकवाडे, मुन्ना आव्हाड, बाळासाहेब गाडे, विजय रोहम, दिलीप सांगळे, विकास शर्मा, भागचंद रुईकर, मधुकर साखरे व्यवस्थापक राजाराम पावरा आदींनी केले आहे.

COMMENTS