नाशिक - भाजप कामगार आघाडी शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांची नाशिकमध्य विधानसभा मतदारसंघ संयोजक पदी निवड केली आहे.

नाशिक – भाजप कामगार आघाडी शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांची नाशिकमध्य विधानसभा मतदारसंघ संयोजक पदी निवड केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कामगार मोर्चा अध्यक्ष विजय हरगुडे यांनी ही निवड केली. त्यांच्यावर पक्षाचे कामगार मोर्चाचे संघटन मजबूत करावे, विविध क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडावी व जास्तीत जास्त श्रमिकांना पक्षाशी जोडावे ही महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे शहर भाजपने स्वागत केले असून पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी भाजपा कामगार आघाडी प्रदेश सरचिटणीस विक्रम नागरे, भाजपा कामगार आघाडी नाशिक शहराध्यक्ष हेमंत नेहेते, भाजपा कामगार आघाडी नाशिक उपाध्यक्ष रोहित गीते, साईनाथ गाडे, नाशिक दक्षिण जिल्हाध्यक्ष दर्शन अहिरे व सर्व प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS