व्यंकटेश अय्यरचे  हजारे ट्रॉफीत 4 सामन्यात 139 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट

Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

व्यंकटेश अय्यरचे हजारे ट्रॉफीत 4 सामन्यात 139 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट

नवी दिल्लीः टीम इंडियाला मिळालेला मोठा संकटमोचक. त्याने सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये धडाकेबाज फलंदाजी करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आ

सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्या
पाक चाहत्याला ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यापासून रोखले
राजस्थान रॉयल्सचा सलग दुसरा विजय

नवी दिल्लीः टीम इंडियाला मिळालेला मोठा संकटमोचक. त्याने सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये धडाकेबाज फलंदाजी करून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडसह मध्य प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरची विशेष चर्चा आहे. ऋतुराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यर या दोन्ही खेळाडूंनी टी 20 तून पदार्पण केले आहे. पण दोघांनाही अजून टीम इंडियाकडून एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र, सध्या ते ज्या पद्धतीने विजय हजारे ट्रॉफीत खेळत आहेत, त्यानुसार आगामी दक्षिण आफ्रिकेतल्या एकदिवसीय मालिकेतील निवडीसाठी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे निवड समितीला अवघड ठरणार आहे. त्यातही विशेषतः व्यंकटेश अय्यरबाबत. कारण सध्या जखमी असल्यामुळे हार्दीक पंड्या भारतीय संघातून बाहेर आहे. त्याच्या गैरहजेरीत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाजू सांभाळणारा अष्टपैलू सध्या तरी संघाकडे नाही. ही उणीव व्यंकटेश अय्यरच्या निवडीमुळे सहज भरून निघू शकते. सध्या तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये सातत्याने चांगला खेळत आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडची चिंता जरूर कमी झाली असेल, यात शंका नाही.

COMMENTS