Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महसूल विभागाने वाळूसह जप्त केलेले वाहन लंपास

अहमदपूर प्रतिनिधी - येथील महसूल विभागाने साधारणतहा: तीन महिण्यापूर्वी अवैद्य वाळू वाहतुक करणारा हायवा टिप्पर जप्त करून तहसील कार्यालयाच्या परिसरा

स्वाभिमानी करणार 22 दिवस आत्मक्लेश आंदोलन
रासायनिक शेतीकडून एकात्मिक पद्धतीकडे टप्प्या टप्प्याने संक्रमण काळाची गरज
राज्याचे माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांची आशियाना निवासस्थानी भेट

अहमदपूर प्रतिनिधी – येथील महसूल विभागाने साधारणतहा: तीन महिण्यापूर्वी अवैद्य वाळू वाहतुक करणारा हायवा टिप्पर जप्त करून तहसील कार्यालयाच्या परिसरात लावला होता तो अज्ञात व्यक्तीने त्यातील वाळू जागेवरच टाकून पळवून नेल्याची घटना दि 25 मे रोजी घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अहमदपूर तहसील कार्यालयाने अवैध वाळू वाहतुक करणा-या हायवा टीप्परवर कारवाई करण्यासाठी पथकांची नेमणूक केली होती त्यातील पथक क्रमांक 4 ने दि 2 फेब्रुवारी रोजी काळेगाव-अहमदपूर रोडवर रात्री अंदाजे 10.. 30 वाजेच्या दरम्यान सोनू मोरे रा सोनखेड ता लोहा जि नांदेड यांच्या मालकीचा हायवा क्रमांक एम एच 46 बी ई 4756 अवैद्य वाळूने भरलेले टीप्पर जप्त करून तहसील कार्यालयातील परिसरात आणून उभा केला होता. तो वाळूने भरलेला हायवा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दि 25 मे रोजी अंदाजे पहाटे 2. ते 5 वाजण्याच्या दरम्यान वाळू तहसील कार्यालयातील परिसरात खाली करून अंदाजे 5 लाख रुपयेकिंमतीचा हायवा पळवून नेला. दि 26 मे रोजी मंडळ अधिकारी स्वाती प्रल्हादराव वाघे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यांत गुरनं 314 / 2023 भारतीय दंड संहिता 186 कलम379 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

COMMENTS