नाशिक प्रतिनिधी - मिशन नवोदय 2023 अंतर्गत ग्रामीण भागातील गुणवंत विदयार्थी यांचा शोध घेऊन तसेच त्यांना *नवोदय सारख्या शाळेत प्रवेश घेण्यास
नाशिक प्रतिनिधी – मिशन नवोदय 2023 अंतर्गत ग्रामीण भागातील गुणवंत विदयार्थी यांचा शोध घेऊन तसेच त्यांना *नवोदय सारख्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी असलेली नवोदय परीक्षेची भीती घालविण्यासाठी वीरबिरसा फाउंडेशन नाशिक यांनी मिशन नवोदय 2023 या उपक्रमांतर्गत तिसरे व शेवटचे सराव चाचणी व मार्गदर्शन शिबीर आज दिनांक 15 एप्रिल 2023 रोजी जि. प. शाळा पिंप्री अंचला येथे आयोजन करण्यात आले त्यात परिसरातील जवळपास 111 मुलांनी सहभाग घेतला असून सकाळ सत्रात दिंडोरी तालुक्याचे *गटशिक्षणाधिकारी मा. कनोज साहेब यांनी ऑनलाईन मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी तसेच नवोदय परीक्षेचे महत्व या बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंप्रीअंचला ग्रामपंचायत *सरपंच बहिरम मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुकर चौधरी,वीरबिरसा चे अध्यक्ष दुर्वादास गायकवाड* यांनी मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
पहिल्या सराव चाचणी 101 मुलांना सहभाग नोंदविला होतो तो वाढून दुसऱ्या सराव चाचणीत 148 पोहचला.तसेच आज तिसऱ्या व शेवटच्या सराव चाचणीत 111 मुलांनी सहभाग नोंदविला यात चौसाळे, करंजखेड, हनुमंतपाडा, हस्ते, एकलहरे, माळेदुमाला, पुणेगाव, पिंप्रीअंचला, अहिवंतवाडी, माळेगावकाजी, भातोडे, अंबानेर,कादवाम्हाळुंगी, करंजाळीगावठा या जिल्हा परिषद शाळा तसेच वरखेडा जनता हायस्कुल, वणी के. आर. टी. हायस्कुल या माध्यमिक शाळांचाही सहभाग होतो.
त्यानंतर नवोदय धर्तीवर सराव चाचणी घेण्यात आली त्यानंतर सदर प्रश्नपत्रिका ही सोडवून दाखविण्यात आली. यासाठी पर्यवेक्षक म्हणून *खंडू बदादे, रोहिदास तुंगार, बाळकृष्ण शिरसाठ,अभिमन बहिरम तसेच निरीक्षण म्हणून रामभाऊ भवर मुख्याध्यापक पिंप्रीअंचला यांनी काम पहिले.*
संजय बोराळे, दिनकर चौधरी, भर्तरीनाथ सातपुते,विजया केदारे मॅडम, बाळू जिरे, तुंगार मॅडम, प्रतिभा ठोंबरे मॅडम, रंगुबाई गायकवाड मॅडम यांनी मुलांना परीक्षेसाठी मुलांना बैठक व्यवस्थेसाठी मार्गदर्शन केले.
COMMENTS