Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुमशेतमधील वीर धारेराव यात्रा उत्साहात

अकोले ः अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतील वीर धारेराव मंदिर राजूर पासून 30 किलोमीटर अंतरावरील कुमशेत हे एक आदिवासी खेडे गाव आहे.एखादी लहान

नगर शहर सहकारी बँकेसह 21 संस्थांच्या निवडणुका थांबल्या
कृषीकन्या विशाखा उघडे हिने साधला शेतकऱ्यांशी संवाद
जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय प्रमुख मार्गदर्शकपदी अशोक (बाबूशेठ) बोरा यांची निवड

अकोले ः अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतील वीर धारेराव मंदिर राजूर पासून 30 किलोमीटर अंतरावरील कुमशेत हे एक आदिवासी खेडे गाव आहे.एखादी लहान मुले जशी आईच्या कमरेवर शोभते तसेच हे कुमशेत गाव कोकण कडेच्या कमरेवर बसलेले आहे.निसर्गाचे मुक्तहस्ते उधळण अत्यंत दाट वृक्षसंपदेने नटलेला हा परिसर आहे. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे मराठी महिन्यातील चैत्रीच्या शेवटच्या रविवारी सालाबाद प्रमाणे नवसाची यात्रा भरत असते. कोंबडा, बकर्‍याचा व गुळ भाताचा नैवेद्य या ठिकाणी वीर धारेरावला दाखवला जातो. या ठिकाणी सर्व भाविक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. देवावर ठेवलेली श्रद्धा ही या ठिकाणी पूर्ण होते.
प्रत्येक रविवारी भाविक भक्त आपले नवस फेडत असतात.तीनशे ते चारशे किलोमीटरच्या अंतरावरून येथे भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.नवसाला पावणारा हा वीर धारेराव हे एक जागृत देवस्थान आहे. या तालुक्यातील कुमशेत या गावी वीर धारेराव याचा एका गरीब आदिवासी कुटुंबामध्ये जन्म झाला. त्याकाळी अठराव्या शतकामध्ये इंग्रजांचा अंमल या परिसरात होता. मुळा नदीच्या प्रवाहाच्या शेजारी जन्म झाला म्हणून त्याचे नाव वीर धारेराव पडले. खूप काही बघायला मिळते निसर्गाचा चमत्कार निसर्गाची हिरवीगार झाडी डोंगर पशुपक्षी प्राणी तसेच हिरवाईने नटलेला डोंगर आपल्याला बघायला मिळतो.यावेळी कळसुबाई हरिश्‍चंद्रगड अभयारण्य राजूर वनरक्षक दत्तू डंबाळे,गुलाब दिवे, वनपाल शेकर पाटोळे, आर.एफ.ओ.दत्तात्रय पडवळे, यांच्या मार्गर्शनाखाली राजूर वनविभागाच्या सर्व टीमने भाविक भक्तांना नियमाचे पालन करण्यास सांगितले.कुटल्याही प्रकारचे गैरवर्तन होणार नाही असे बोलताना सांगितले.

COMMENTS