श्रीरामपूर/वार्ताहर : श्रीरामपूर येथील उपविभागीय पाटबंधारे पदावरून सेवानिवृत्त झालेले वसंतराव दशरथ शिंदे यांनी त्यांच्या 39 वर्षाच्या नोकरीत अत्यन्त
श्रीरामपूर/वार्ताहर : श्रीरामपूर येथील उपविभागीय पाटबंधारे पदावरून सेवानिवृत्त झालेले वसंतराव दशरथ शिंदे यांनी त्यांच्या 39 वर्षाच्या नोकरीत अत्यन्त प्रामाणिक राहून शेतकरी, ग्रामीण समाजाच्या हिताची कामे स्वच्छ मनाने केली, पाटबंधारे खात्याला त्यांनी आपल्या प्रामाणिक वागण्याने प्रतिष्ठा मिळवून दिली, हा आदर्श जपला पाहिजे असे मत आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केले.
येथील स्वयंवर मंगलकार्यालयात श्रीरामपूर येथील पाटबंधारे खात्यातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले उपविभागीय अधिकारी वसंतराव दशरथ शिंदे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार लहू कानडे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे,सभापती डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे, माऊली मुरकुटे, सिद्धार्थ मुरकुटे,सचिन गुजर, करण ससाणे, सुभाष फरगडे,विकास शिंदे, सुनील जगताप बबनराव मुठे, अरुण पाटील नाईक,तहसीलदार प्रशांत पाटील, पत्रकार बाळासाहेब तनपुरे, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये,किशोर गाढे, भाऊसाहेब डोळस, सुभाष शिंदे, अशोक थोरे, योगेश जोर्वेकर, प्रीतम शेवाळे, राजेंद्र पावटेकर,रामनाथ सातपुते, अहिलाजी खैरे, प्रदीप अभन्ग, संजय भागवत,सुधाकर कासार,राकेश शिवदे,बाळासाहेब नाईक, सुरेश ताके, सरपंच आबासाहेब गवारे, ज्ञानदेव साळुंखे, अशोक पवार, भगीरथ जाधव,भाऊसाहेब गलांडे आदी मान्यवर उपस्थित होते. भगवानराव शिंदे यांनी सर्व मानवरांचे बुके, शाल देऊन स्वागत, सत्कार केला.आमदार लहू कानडे यांनी आपल्या मनोगतात पुढे सांगितले की,पाटबंधारे खात्यातील ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा पुढील काळातही देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा असे आवाहन केले,.माजी आमदार भानुदास मुरकुटे हे आपल्या भाषणात म्हणाले, वसंतराव शिंदे यांनी ग्रामीण भागात, शेतकरी वर्गात स्वतःची प्रामाणिक प्रतिमा तयार केली. शेती, शेतकरी आणि पाणी यांचे नाते जवळचे आहे, वसंतराव शिंदे यांनी पाटबंधारे खात्यातील कार्याने आदर्श निर्माण केला असे सांगून आपले पुढील जीवन काही चांगल्या कामातून निरंतर चालू ठेवावे त्यासाठी आपण सहकार्य करू असे आश्वासन दिले.सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी वसंतराव शिंदे यांनी आमच्या इंदिरानगर परिसरात जसा आपुलकीचा मित्रपरिवार निर्माण केला तसाच प्रामाणिक कामातून सर्वत्र जिव्हाळा पेरला आहे, त्यांचा सर्वच परिवार आदर्श असल्याचे सांगितले. भाजपचे बबनराव मुठे म्हणाले, वसंतराव शिंदे यांना ग्रामीण आणि शहरी भागात मोठा सन्मान निर्माण आहे, त्यांच्यासारखे शेतकरी हिताचे अनुभवी अधिकारी राजकारणात आले तर ते अधिक उपयुक्त होईल, त्यांनी भाजपात काम करावे ते नक्कीच आमदार होतील अशा भावना व्यक्त केल्या. मुळा प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे यांनी सांगितले की, वसंतराव शिंदे यांच्यासारखे अधिकारी हे जनमनात आदराचे स्थान निर्माण करतात त्यांना यापुढील जीवनवाटचालीतही सहकार्य करू असे आश्वासन दिले.तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले की, शिंदे यांनी पाटबंधारे खात्याचा नावलौकिक वाढविला. साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी मित्रवर्य वसंतराव शिंदे यांच्या उंदीरगावातील अनेक आठवणी सांगून एका आदर्श मित्राचा आपणास सार्थ अभिमान आहे, त्यांनी सेवानिवृत्तीनंतर ‘वसंतपालवी ‘आत्मचरित्रपर लेखन करावे आणि पुढील पिढीला आपला आदर्श सांगावा ही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पत्रकार बाळासाहेब तनपुरे,पाटबंधारे खात्यातील अधिकारी, कुटुंबातील सौ.मनीषा निखिल वेताळ,सौ.शिल्पा अभिजित आगवणे यांनी मनोगत व्यक्त केले. वसंतराव शिंदे यांनी आपल्या जीवनवाटचालीतील प्रसंग सांगून 81गावातील लोकांचा सहवास आणि सात आमदाराचे चांगल्या कामासाठी पाठींबा लाभला, त्यामध्ये आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार गोविंदराव आदिक,आमदार भानुदास मुरकुटे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार जयंतराव ससाणे, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार लहू कानडे यांचे मौलिक मार्गदर्शन, सहकार्य लाभल्यामुळे आपणास चांगले काम करता आले,असे सांगून आपल्या सेवापूर्तीनिमित्त मोठा मित्रपरिवार, स्नेहीजण उपस्थित राहून त्यांनी सन्मान केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन कवयित्री सौ.संगीता अशोकराव कटारे / फासाटे यांनी केले.निखिल रामदास वेताळ यांनी आभार मानले.
COMMENTS