Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसंतदादा पाटील महाविद्यालयात स्वा. सावरकर यांची जयंती साजरी

पाटोदा प्रतिनिधी - येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची जयंत

हळद शिजवताना कुकरचा स्फोट
प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाला शह !
अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवस पुरेल एवढ्याच कोरोना प्रतिबंधक लस

पाटोदा प्रतिनिधी – येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे होते. त्यांच्या हस्ते स्वा. सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यप्रसंगी ग्रंथपाल प्रा.जगन्नाथ पटाइत व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य हांगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान योगदानावर सविस्तर भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. जगन्नाथ पटाइत यांनी केले. आभार कार्यालय अधिक्षक अनिल क्षीरसागर यांनी मानले.

COMMENTS