Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विविध सामाजिक उपक्रमांनी संतोष भंडारी यांचा वाढदिवस साजरा

गेवराई प्रतिनिधी - महाराष्ट्रभर युवा उद्योजक म्हणून चर्चेत असलेले व छत्रपती मल्टीस्टेट या वित्त संस्थेच्या माध्यमातून लोकांच्या आर्थिक गरजा पुर्ण

पत्र्याच्या पेटीत आढळला महिलेचा मृतदेह l LOKNews24
दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञानं केलेल्या भविष्यवाणीनं वाढली चिंता | LOKNews24
महाराष्ट्रातील धरणांमध्ये 36 टक्के पाणीसाठा

गेवराई प्रतिनिधी – महाराष्ट्रभर युवा उद्योजक म्हणून चर्चेत असलेले व छत्रपती मल्टीस्टेट या वित्त संस्थेच्या माध्यमातून लोकांच्या आर्थिक गरजा पुर्ण करत महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यात 21 शाखेचे जाळे निर्माण केलेल्या छत्रपती मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष संतोष भंडारी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर,एक व्यक्ती एक झाड भेट तसेच ग्रामिण रूग्नालय येथे रूग्नांना फळ वाटप करून  वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी संतोष भंडारी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.रक्तदान शिबिराने सुरूवात झालेल्या सामाजिक उपक्रमांत 87 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.यावेळी रक्तदात्यांना छत्रपती मल्टीस्टेट कडून गिफ्ट देण्यात आले.त्याबरोबरच उपस्थित सर्वांना एक व्यक्ती एक झाड भेट देण्यात आले.तसेच ग्रामिण रूग्नालय गेवराई येथे रूग्नांना फळ वाटप करण्यात आले.विविध सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात आला.तसेच आजच्या दिवशी मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांना छत्रपतीच्या ब्रॅड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली.तसेच या वाढदिवसाच्या काळात ग्राहकांचा आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने 365 दिवसांच्या ठेवीवर 11+1=12% व्याजदर देण्यात आलेला आहे.ही योजना 17 जूनपर्यंत चालू राहील.या योजनेचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.सामाजिक उपक्रमात दिवसभर चाललेल्या रक्तदान शिबीरात अनेकांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमास प्रतिसाद दिला.टीम सहका-यांनी राबवलेल्या या उपक्रमाबद्दल संतोष भंडारी यांनीही आनंद व्यक्त करत माझ्या वाढदिवशी या असे समाजपयोगी उपक्रम घेऊन मला वाढदिवसांची अनोखी भेट दिली आहे.या पेक्षा कोणतेच गिफ्ट सरस असू शकत नाही.अशी भावना व्यक्त केली.हे उपक्रम पार पाडण्यासाठी राजेंद्र दादा भंडारी,शरद देशमुख,आविनाश माळवदे,गोविंद शहाणे,वैभव सोळंके,सुभाष गुंजाळ,स्वप्निल सोनवणे,नाना कानडे,दस्तगीर शेख अदिनी परिश्रम घेतले.

COMMENTS