Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यातील भोंदवडे येथे विविध कार्यक्रम संपन्न

आष्टी प्रतिनिधी - वृक्षारोपण,पक्ष्यांच्या चारापाणीसाठी भांडी वाटप,पाणपोई,मनोरंजत्मक खेळ सभासदांना नियुक्ती पत्र,  सरस्वती पुजन करून तसेच स्वर्गीय

जैन श्‍वेतांबर संघाच्या वतीने रक्तदान शिबीर उत्साहात
रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हिरवा झेंडा
आईस्क्रीममध्ये आढळले माणसाचे बोट

आष्टी प्रतिनिधी – वृक्षारोपण,पक्ष्यांच्या चारापाणीसाठी भांडी वाटप,पाणपोई,मनोरंजत्मक खेळ सभासदांना नियुक्ती पत्र,  सरस्वती पुजन करून तसेच स्वर्गीय आबासाहेब मोरे व स्वर्गीय गौतम सावंत साहेब यांच्या प्रतिमेचे पुजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.प्रमोद दादा मोरे महाराष्ट्र राज्याध्यक्ष यांनी पक्ष्यांच्या चारापाणीसाठी आणलेली भांडी वाटप करण्यात आली.प्रमोद दादांच्या हस्ते वृक्षारोपण,पाणपोईचे उद्घाटन,धार्मिक स्थळी डस्टबिन वाटप व पक्ष्यांच्या चारापाणीसाठी भांडी वाटप करण्यात आले.तसेच सातारा जिल्ह्यातील नवीन कार्यकारणीची निवड आणि कोरेगांव तालुका स्तरावर परसबाग या उपक्रमात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्या बद्दल अनिल कदम यांचाही सत्कार करण्यात आला. महिलांच्या मनोरंजनात्मक खेळात चमचा लिंबू,फुगा पासिंग,संगित खुर्ची व लकी ड्रा.काढून बक्षीस वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी  राज्याध्यक्ष प्रमोद दादा मोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य व मा.प्रमोद काकडे सर,मा.सुभाष धुमाळ साहेब,सुभाष वाखारे साहेब,तसेच सातारा जिल्हा अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव कार्यकारिणी सदस्य आणि भोंदवडे परिसरातील पर्यावरण प्रेमी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.पर्यावरण गृपमधील सर्व सदस्याचे खूपखूप आभार सगळ्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

COMMENTS