Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काळे’ शैक्षणिक संकुलात विविध कार्यक्रम उत्साहात

कोपरगाव : स्व. सुशिलामाई काळे यांच्या स्मृती दिनानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळा महाविद्यालयात संस्थेच्या सचिव  चैता

गौतम’च्या संगणक विभागाचा ‘सुनंदा इन्फोटेक’शी करार
‘समता’ स्कूलमध्ये ‘ऊर्जा 2.0’ मेगा स्पोर्ट उपक्रमाचा जल्लोष
संजीवनीच्या पाच विद्यार्थ्यांना डेलाॅईट कंपनीत नोकरी

कोपरगाव : स्व. सुशिलामाई काळे यांच्या स्मृती दिनानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळा महाविद्यालयात संस्थेच्या सचिव  चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आतंर शालेय भव्य चित्रकला स्पर्धेचे आणि प्राथमिक विभागाचे क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध कार्यक्रम व विविध स्पर्धामध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा व रौप्य महोत्सवी वर्षात झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रईसा शेख यांच्या हस्ते पारितोषिके देऊन त्यांचा करण्यात आला.

सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. विजया गुरसळ होत्या. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे इन्स्पेक्टर प्रा.नारायण बारे यांनी स्व. सुशीलामाई काळे यांच्या कार्याला उजाळा दिला. गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट यांच्या वतीने शहाजापूर, कोळपेवाडी, कुंभारी गावामध्ये ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवून परिसराची स्वच्छता केली. 

 यावेळी ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमात राघवेश्वर मंदिराचे मठाधीपती महंत १०८ श्री राघवेश्वरानंदगिरी महाराज, बाबुराव कोल्हे, संस्थेचे इन्स्पेक्टर प्रा. नारायणराव बारे, शरद वाबळे,  सागर कोळपे, अनिल कोळपे, प्रतिभा गायकवाड, वैशाली आभाळे,  प्रवीण निंबाळकर, निलेश डुबे,  पांडुरंग दिघे, पोपटराव गुंड, कैलास डुबे, प्रभाकर गुंजाळ, बाबासाहेब गुंजाळ, सुभाष सोनवणे, गोकुळ कांडेकर, अनिल गुंजाळ, ग्रामस्थ,  प्रा. डॉ. विजया गुरसळ, प्राचार्य वसीम शेख, प्राचार्य नूर शेख, मुख्याध्यापक प्रकाश देशमुख, बाळासाहेब गुडघे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS