पुणे: घाटमाथ्यावरील पाऊस कमी झाला असल्याने भोर-महाड या मार्गावरील पुण्याच्या हद्दीतील वरंध घाट शुक्रवारपासून (25 ऑगस्ट) सर्व प्रकारच्या वाहनांसाठ
पुणे: घाटमाथ्यावरील पाऊस कमी झाला असल्याने भोर-महाड या मार्गावरील पुण्याच्या हद्दीतील वरंध घाट शुक्रवारपासून (25 ऑगस्ट) सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतुकीला खुला करण्यात येणार आहे. भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी याबाबतचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश प्रसृत केले.
भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीबाबत लाल आणि नारंगी इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने भोर-महाड मार्गावरील पुण्याच्या हद्दीतील वरंध घाट 30 सप्टेंबरपर्यंत बंद करण्यात आला होता. वाहनांची वाहतूक बंद करुन इतर वेळी हलक्या वाहनांची वाहतूक सुरु ठेवण्यात आली होती. आता हवामान खात्याकडून अतिवृष्टीबाबत कोणत्याही प्रकारचे इशारे देण्यात आलेले नाहीत. परिणामी वरंध घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
COMMENTS