मुंबई : देशभरातील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ही स्थळे वंदे भारत एक्स्प्रेसने जोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत आत

मुंबई : देशभरातील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ही स्थळे वंदे भारत एक्स्प्रेसने जोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत आता मुंबई ते कोल्हापूर दरम्यान मंगळवारपासून (दि 12) वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. या सोबतच पुणे ते वडोदरा ही वंदे भारत एक्सप्रेस देखील उद्या पासून धावणार असून याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. दरम्यान, या गाड्यांमुळे दोन्ही शहरांतिल अंतर आता कमी होणार असून कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांची देखील सोय होणार आहे.
COMMENTS