उत्तर प्रदेश प्रतिनिधी - वंदे भारत ट्रेनच्या धडकेत मायलेकींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ही घटना घडली. प

उत्तर प्रदेश प्रतिनिधी – वंदे भारत ट्रेनच्या धडकेत मायलेकींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ही घटना घडली. पतीच्या समोरच पत्नी आणि दोन मुलींना ट्रेनने धडक दिली. बंद असलेल्या फाटकातून रेल्वे रुळ ओलांडत असताना हा प्रकार घडला असून तिघांनी जीव गमावला.
कंकरखेडा क्षेत्रातील कासमपूर फाटक इथं ही घटना घडली असून दिल्लीहून सहारनपूर जाणाऱ्या वंदे भारत रेल्वेला आईसह दोन मुली धडकल्या. कासमपूर फाटकावर नरेश कुटुंबासह चुकीच्या पद्धतीने रेल्वे रुळ ओलांडत होता. यावेळी वंदे भारत ट्रेनच्या धडकेत नरेशची पत्नी मोना आणि दोन मुली चारू आणि इशिका यांचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली. पोलीस आणि जीआरपी घटनास्थळी दाखल झाले. लोकांच्या मदतीने रुळावरून मृतदेह हटवण्यात आले. मृतदेह शवविच्छेदना साठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
COMMENTS