Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांदोली अभयारण्यात वणवा; आग विझविण्याचे वन्यजीव यंत्रणेचे केविलवाणा प्रयत्न; वनव्याचे सत्र सुरू; महिन्याभरातील दुसरी घटना

शिराळा / प्रतिनिधी : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणार्‍या चांदोली बु। येथील जानाईवाडी नजीक असलेल्या डोंगरास गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सु

पावसाळ्यात जीवित व वित्तहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी : ना. बाळासाहेब पाटील
गाय खरेदीसाठी दूध उत्पादकांचे पंजाब-हरियाणाला प्राधान्य
राज्यात थंडीचा जोर वाढला

शिराळा / प्रतिनिधी : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणार्‍या चांदोली बु। येथील जानाईवाडी नजीक असलेल्या डोंगरास गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अज्ञातांकडून लावलेल्या आगीमुळे वनसंपदेचे प्रचंड नुकसान होत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पानजीक वणवा लागण्याची या महिन्याभरात ही दुसरी घटना आहे. वार्‍याचा वेग भयाण असल्यामुळे तितक्याच वेगाने आग सगळीकडे पसरत होती. धुराचे कल्लोळ परिसरभर पसरले होते. या आगीमध्ये डोंगररांगातील झाडे-झुडपे अनेक जीवजंतू, सरपटणारे प्राणी, जळून खाक होत असून वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे.
काही विग्नसंतोषी लोकांकडून या परिसरातील डोंगररांगांना आगी लावल्या जात आहेत. डोंगररांगामध्ये आंबा, जांभूळ, सागवान, निलगिरी, अशोका, भेडा, गेळी, अंजनी, कुंभा, आंबिरा, हिरडा, नरक्या अशा विविध प्रकारच्या झाडांप्रमाणे करवंद, तोरणा, आवळा अशी झुडपे आहेत. अभयारण्याला लागूनच या डोंगररांगा असल्याने अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व या डोंगररांगामध्ये टिकून आहे. आगीत सरपटणारे प्राणी, दुर्मिळ व औषधी वनस्पती तसेच अनेक वन्यजीव जळून खाक होत असून वारंवार लागणार्‍या आगीमुळे वनसंपत्तीचे मोठे नुकसान होऊ लागले आहे.
आग विझविण्यासाठी वन्यजीव विभागाकडे प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने अथवा त्यासाठी लागणारी कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्याने वन्यजीवचे कर्मचारी आग विझविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. वन्यजीव कार्यालयातील अधिकार्‍यांची मुजोरी व या परिसरातल्या विविध समस्या अशा अनेक कारणांमुळे स्थानिक ग्रामस्थ व वन्यजीव प्रशासनामध्ये असलेल्या मतभेदांमुळे आग विझविण्यासाठी कोणीही ग्रामस्थ पुढे येत नसल्याचे चित्र होते.

COMMENTS