वैभव मांगलेनं सोडलं ‘अलबत्या गलबत्या’ नाटक

Homeताज्या बातम्यामनोरंजन

वैभव मांगलेनं सोडलं ‘अलबत्या गलबत्या’ नाटक

मराठी नाट्यक्षेत्रात काही गाजलेल्या बालनाट्यापैकी एक नाटक म्हणजे 'अलबत्या गलबत्या'. अभिनेता वैभव मांगलेनं( Vaibhav Mangle) आपल्या अभिनयानं आणि दमदार

भारत अमेरिकेकडून 30 प्रेडिएटर ड्रोन विकत घेणार (Video)
कुपोषित बालकांच्या पालकांना कोंबड्यांचे वाटप 
देशभरात 70 लाख सिमकार्ड केले ब्लॉक

मराठी नाट्यक्षेत्रात काही गाजलेल्या बालनाट्यापैकी एक नाटक म्हणजे ‘अलबत्या गलबत्या’. अभिनेता वैभव मांगलेनं( Vaibhav Mangle) आपल्या अभिनयानं आणि दमदार संवादानं हे नाटक एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. नाटकातील चिंची चेटकीण वैभव मांगलेनं उत्तमरित्या साकारली मात्र हीच चिंची चेटकीण प्रेक्षकांना आता पाहता येणार नाही. अभिनेता वैभव मांगलेनं अलबत्या गलबत्या हे नाटक सोडल्याचं जाहीर केलं आहे. वैभव मांगलेकडे वेळ नसल्यानं त्यानं हे नाटक सोडल्याचं कारण समोर आलं आहे.  सोशल मीडियावर नव्या चिंची चेटकीणीचे फोटो शेअर करत ‘ती मी नव्हेच’ असं म्हणत वैभवनं नाटक सोडल्याची माहिती दिली आहे.

COMMENTS