वडापाव विक्रेत्यांवर कोयत्यानं हल्ला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वडापाव विक्रेत्यांवर कोयत्यानं हल्ला

याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक प्रतिनिधी  - राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता नाशिकमध्ये कोयत्याचा नंगानाच पाहायला मिळाला आहे. व

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी
वारकर्‍याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पलटी; दाम्पत्याचा जागीच अंत
आयपीएल सट्टा अड्यावर एलसीबीची धाड

नाशिक प्रतिनिधी  – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता नाशिकमध्ये कोयत्याचा नंगानाच पाहायला मिळाला आहे. वडापाव विक्रेत्यांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. नाशिकरोड येथील शाहुपथ येथे ही कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेचा संपूर्ण थरार हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. विशाल गोसावी या वडापाव विक्रेत्यावर अज्ञातांनी कोयत्याने हल्ला केला. खुन्नसने का बघतो म्हणून विचारणा करत त्याला मारहाणही केली. तर तेजस गोसावी वडापाव गाडीवर मिळून न आल्याने त्याचे दाजी विशाल गोसावी यांना मारहाण करण्यात आली.तेजस गोसावी मिळाला नाही म्हणून नंतर त्याच्या घरी जाऊन दगडफेक केल्याचीही घटना समोर आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

COMMENTS