Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

  संशोधन क्षेत्रातील वाड;मयचौर्य नव संशोधकांसाठी धोक्याचे- प्राचार्य डॉ. अर्चना आदिक पवार

रिसर्च मेथडॉलॉजी अँड आय. पी.आर' या विषयावरील एकदिवसीय वेबिनार प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.

कोपरगाव प्रतिनिधी -  अलीकडे संशोधन क्षेत्रात काही अनावश्यक गोष्टींचा शिरकाव वाढला असून वाड;मयचौर्य ही एक अत्यंत गंभीर बाब प्रामुख्याने पुढे ये

ग्राहकांच्या सुविधेसाठी शनिवार व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरु
नगरच्या साईबन शिवारात दहा वर्षीय मुलीवर अत्याचार
अहमदनगरच्या जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ. रवींद्र ठाकुर रुजू

कोपरगाव प्रतिनिधी –

 अलीकडे संशोधन क्षेत्रात काही अनावश्यक गोष्टींचा शिरकाव वाढला असून वाड;मयचौर्य ही एक अत्यंत गंभीर बाब प्रामुख्याने पुढे येत आहे. नव्या संशोधकांसाठी ही गोष्ट अत्यंत धोकादायक आणि संशोधनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे असे परखड मत स्व. श्री. नामदेवराव परजने पाटील(Namdevrao Parjane Patil) लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अर्चना आदिक पवार(Archana Adik Pawar) यांनी व्यक्त केले. येथील श्री. सद् गुरु  गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अँड संजीवनी कॉमर्स कॉलेजमध्ये आय. क्यु. ए. सी. व इंग्रजी विभाग यांचे संयुक्त विद्यमाने ‘रिसर्च मेथडॉलॉजी अँड आय. पी.आर'(Research Methodology and IPR) या विषयावरील एकदिवसीय वेबिनार प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप(Dr. Ramesh Sanap) होते. डॉ. पवार यांनी पुढे आपल्या व्याख्यानात वाड;मयचौर्यासंबंधी होणाऱ्या शिक्षा व कॉपी राईटचे नियम या अनुषंगाने सविस्तर भाष्य केले. 

       अध्यक्षीय विचार व्यक्त करतांना प्राचार्य डॉ. रमेश सानप म्हणाले की, संशोधन क्षेत्रातील आव्हाने अलीकडच्या काळात खूपच प्रभावशाली होत असून नवसंशोधकानी या आव्हानांचा सामना करण्यासाठी अधिकाकाधिक प्रगल्भ  दृष्टीने विविध बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. अखेरीस त्यांनी आय. पी. आर. तसेच शोधनिबंध लेखन यासंदर्भाने मार्गदर्शन केले. चर्चासत्राचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष रणधीर(Dr. Subhash Randhir) यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. मनोज आवारे यांनी केले तर प्रा.महेश दिघे यांनी आभार मानले.सदर प्रसंगी महाविद्यालयातील  प्राध्यापक, संशोधक  तसेच इंग्रजी विभागातील विद्यार्थी बहुसंख्येने ऑनलाईन उपस्थित होते.

COMMENTS