Homeताज्या बातम्यादेश

ब्रिक्स चलन आणण्याची ही योग्य वेळ नाही : पुतीन

कझान : रशियातील कझान येथे ब्रिक्स देशांची सुरू असलेल्या शिखर परिषदेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ब्रिक्स चलनाबद्दल उघडपणे आपली भ

पत्नीचे अश्लील फोटो पतीला पाठवून पैसे मागणाऱ्या तरुणाला अटक | LOKNews24
मोबाईलच्या स्फोटात ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
पुण्यात पार्किगच्या वादातून महिलेला जिंवत जाळण्याचा प्रयत्न

कझान : रशियातील कझान येथे ब्रिक्स देशांची सुरू असलेल्या शिखर परिषदेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ब्रिक्स चलनाबद्दल उघडपणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.गेल्या काही दशकांपासून डॉलरचा चांगलाच भाव वधारतांना दिसून येत आहे. मात्र ब्रिक्स परिषदेतील देश ब्रिक्स चलन आणणार असल्याचे दिसून येत आहे. त्यासंदर्भात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ब्रिक्स चलनाबद्दल उघडपणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुतीन यावेळी म्हणाले की, ब्रिक्स देशांनी स्वत:चे चलन सुरू करण्याची वेळ अद्याप आलेली नाही, असे त्यांनी म्हटले. त्याचवेळी, दहा देशांचा ब्रिक्स समूह परस्पर व्यापार आणि गुंतवणुकीत डिजिटल चलनाचा वापर करण्याचा विचार करत असल्याचेही पुतीन यांनी उद्धृत केले. यासाठी रशिया भारतासह इतर देशांसोबत काम करत असून भारताने आधीच अमेरिकन डॉलरच्या तुलनेत कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

COMMENTS