नवी दिल्ली ः उत्तराखंडमधील पिथौरागढमध्ये बुधवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी होती. सकाळी 9.55 वाजता भूकंपाचे
नवी दिल्ली ः उत्तराखंडमधील पिथौरागढमध्ये बुधवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी होती. सकाळी 9.55 वाजता भूकंपाचे हे धक्के जाणवले आहेत. केवळ पिथौरागढच नाही, तर आजुबाजूच्या जिल्ह्यांनाही भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे अजून समोर आलेले नाही. गेल्या काही दिवसांत भारतात अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अनेकदा या भूकंपांमुळे जीवितहानीही झाली आहे. आता उत्तराखंडमध्ये भूकंप झाल्याचे समोर आले आहे.
COMMENTS