उत्तरप्रदेशात दुसर्‍या कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा

Homeताज्या बातम्यादेश

उत्तरप्रदेशात दुसर्‍या कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा

लखनऊ/वृत्तसंस्था : उत्तरप्रदेशात भाजपमध्ये सध्या आलबेल नसल्याचे चित्र नाही. विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतांनाच, उत्तरप्रदेशात भाजपच

थकबाकी वसुलीसाठी बंद करणार सांडपाणी मार्ग ; मुंबई महापालिकेचा अनोखा उपाय; मालमत्ताधारक रडारवर
साईमंदिरात फुल-हार सुरू करण्यासाठी प्रयत्नशील ः डॉ. सुजय विखे
किरीट सोमय्यांना शहरात कायमची प्रवेशबंदी… नगरपालिकेने केला ठराव

लखनऊ/वृत्तसंस्था : उत्तरप्रदेशात भाजपमध्ये सध्या आलबेल नसल्याचे चित्र नाही. विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतांनाच, उत्तरप्रदेशात भाजपचे कॅबिनेट मंत्री, प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर 24 तासामध्ये दुसर्‍या कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर भाजपा सरकारमधील आणखी एक मंत्री दारा सिंह चौहान यांनी राजीनामा दिला आहे. चौहान हेसुद्धा स्वामींप्रमाणेच ओबीसी समाजातील होते. वन आणि पशु फलोत्पादन मंत्री दारा सिंह चौहान यांनी राज्यपालांना आपल्या राजीनाम्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. माझ्या विभागाच्या भल्यासाठी मी मनापासून काम केले, पण योगी सरकारच्या मागासलेल्या, दलित, दलित, शेतकरी आणि बेरोजगार तरुणांप्रती योगी सरकारच्या घोर उपेक्षित वृत्तीसोबतच मागासलेल्या, दलितांच्या आरक्षणाबाबत होत असलेल्या गोंधळामुळे मी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाचा राजीनामा देत आहे, असे दारा सिंह चौहान यांनी म्हटले आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्याप्रमाणे दारा सिंह चौहान हे देखील भाजपामध्ये येण्यापूर्वी बहुजन समाज पक्षाचे (बसपा) नेते होते. 2015 मध्ये त्यांनी बसपा सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. तीन वेळा खासदार राहिलेल्या चौहान यांना भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपाचे सदस्यत्व दिले होते. चौहान यांना ओबीसी मोर्चाचे अध्यक्षही करण्यात आले होते. मधुबन विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर त्यांना योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते. मात्र आता निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिला आहे.
दरम्यान, भाजप आमदार अवतार सिंह भडाना यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रीय लोक दलात प्रवेश केलाय. भडाना हे मेरठच्या मीरापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. रालोदने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती देताना, माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते अवतार भडाना आज राष्ट्रीय लोकदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी जयंत सिंह यांच्या उपस्थितीत रालोदमध्ये प्रवेश केला

बुडत्या बोटीवर स्वार होणार्‍यांचेच नुकसान : केशव प्रसाद मौर्य
उत्तरप्रदेशात एका पाठोपाठ दोन कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे. दारा सिंह चौहान यांच्या राजीनाम्यानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते केशव प्रसाद मौर्य यांनी त्यांना या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. कुटुंबातील एखादा सदस्य चुकला तर खूप त्रास होतो. निघालेल्या आदरणीय मान्यवरांना माझी एवढीच विनंती आहे की बुडत्या बोटीवर स्वार होऊन नुकसान त्यांचेच होईल. असे केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे.

राजीनामा दिलेल्या प्रसाद मौर्य यांच्या विरोधात अटक वॉरंट
सरकारमधील माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात धार्मिक भावना भडविण्याच्या प्रकरणात अटक वॉरंट निघाला आहे. कोर्टाने 24 जानेवारीपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. मौर्य यांनी बसपामध्ये असताना देवी-देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. प्रकरणावर 24 जानेवारीला सुनावणी होणार आहे. हा आदेश 2016 मध्ये उच्च न्यायालयाकडून देण्यात आला होता तेव्हा त्यांनी या आदेशावर स्टे ऑर्डर घेतलेला होता.

COMMENTS