Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उसतोड कामगारांना प्रतिटन सातशे रूपये भाव द्यावा

क. एकनाथ आवाड उसतोड कामगार संघटना व पश्चिम भारत मजदुर मंचचे निवेदन

माजलगाव प्रतिनिधी - उसतोड कामगारांना प्रतिटन सातशे रूपये भाव द्यावा या मागणीचे निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना कर्मविर एकनाथ आवाड उसतोड का

नेवासा तालुका जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी “भारतपुरी गोसावी” यांची निवड
गावठी हातभट्टी विक्री करणार्‍यांवर कारवाई
Yeola :इगतपुरी येथील ट्रेनमध्ये झालेली घटना अतिशय निंदनीय – भुजबळ (Video)

माजलगाव प्रतिनिधी – उसतोड कामगारांना प्रतिटन सातशे रूपये भाव द्यावा या मागणीचे निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना कर्मविर एकनाथ आवाड उसतोड कामगार संघटना, पश्चिम भारत मजदुर अधिकार मंच व मानवी हक्क अभियानच्या वतीने सोमवारी दि. 24 एप्रिल रोजी देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्ातील सर्व उसतोड कामगारांची ऑक्टोबरच्या आत नोंदणी करून त्याची यादी प्रसिध्द करावी, उसतोड कामगार घरून निघाल्यापासुन ते हंगाम अटोपुन परत येईपर्यंतची  जबाबदारी घेत अशा पध्दतीचा विमा उतरविण्यात येउन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी हॉस्टेलची सोय करण्यात यावी, त्यांना आरोग्याची सुविधा पुरविण्यात याव्यात, राहत्या ठिकाणी शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, काम करत असतांना आरोग्याच्या निर्माण होत असलेल्या समस्यांमुळे प्रत्येक आठवड्याला त्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, उसतोड तोडतांना प्रतिटन सातशे रूपये भाव देण्यात यावा, उसतोड कामगारांना कामगार कायद्यांतर्गत थेट कारखान्याचा कामगार याची मान्यता देण्यात यावी, उसतोड कामगारांना माथाडी कायदा लागु करण्यात यावा या व अशा विवीध प्रश्नांना घेउन सविस्तर चर्चा करण्यात आली व साखर आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी पश्चिम भारत मजदुर अधिकार मंच गुजरातचे सुधिर कटियार,  कर्मविर एकनाथ आवाड उसतोड कामगार संघटना अध्यक्ष राजेश घोडे, अशोक भोसले फलटण, नितीन पवार, गणेश वाघ सातारा, गौतमी कुलकर्णी पुणे, शरद मणियार, जयश्रीताई मध्यप्रदेश, आकाश हातागळे, यांचेसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS