Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मधुमेहाला थांबविण्यासाठी त्रिसुत्रीचा वापर आवश्यक : डॉ. पंकज राणे

दीर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे व्याख्यानाचे आयोजन

नाशिक प्रतिनिधी -  भारत हा झपाट्याने मधुमेहाचे रूग्ण वाढत जाणारा देश म्हणून ओळखला जात असून याच मधुमेहाला थांबवायचे असेल तर उत्तम आहार, योग्य व्या

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
उद्धव ठाकरेंचा राजीनामा ठरणार कळीचा मुद्दा
एसटी बससेवा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक प्रतिनिधी –  भारत हा झपाट्याने मधुमेहाचे रूग्ण वाढत जाणारा देश म्हणून ओळखला जात असून याच मधुमेहाला थांबवायचे असेल तर उत्तम आहार, योग्य व्यायाम आणि वेळेवर उपचार या त्रिसुत्रीचा वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नारायणी हॉस्पीटलचे मधुमेह व हृदयविकार तज्ञ डॉ. पंकज राणे यांनी केले. दीर्घायुषी ज्येेष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित ‘मधुमेह आणि हृदयविकार’ या विषयावरील जनजागृतीपर व्याख्यानात डॉ. राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक अमोल जाधव, संगिता जाधव, दीर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकांत सुरते, रविंद्र वाटेकर, तुकाराम येवले, रमेश जगताप, रामदास बागुल, नारायण धामणे उपस्थित होते. यावेळी डॉ. राणे म्हणाले की, भरपूर तहान लागणे, नेहमीपेक्षा भरपूरवेळा लघवीला जावं लागणं, जखमा फार संथपणे भरणं, दृष्टी कमकुवत होणं ही मुख्यत्वे मधुमेहाची लक्षणे असतात.

डायबेटिस होऊ नये यासाठी स्वतःचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. आपलं वजन, रक्तातील साखरेची पातळी, जीवनशैली यांचा विचार करणे महत्वाचे आहे.   घरामध्ये डायबेटिसने मागच्या पिढ्यांमध्येच प्रवेश केला केला आहे अशा लोकांना डायबेटिसचा धोका जास्त असतो. त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरजेचे असल्याचेही डॉ. राणे यांनी सांगितले.

सुरुवातीला श्रीकांत सुरते यांची ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याची माहिती प्रास्ताविकातून उपस्थितांना दिली. तसेच माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी ज्येष्ठांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून ज्येष्ठांना आनंदी जीवन जगता यावे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी दीर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरविंद अत्तरदे यांनी आभार मानले तर सुत्रसंचालन रमेश जगताप यांनी केले.

COMMENTS