Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातुरात बनावट नंबरप्लेटचा वापर; ऑटोचालकावर फसवणुकीचा गुन्हा

लातूर प्रतिनिधी - ऑटोवर बनावट नंबरप्लेटचा वापर करुन फसवणूक केल्याची घटना लातूर शहरात घडली. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात ऑटोचालकाविरोधात शुक्रव

अमृतवाहिनीमध्ये नॅशनल कंपन्यांचे टेक्निकल फेस्ट उत्साहात
खावटी अनुदान योजनेतून आदिवासी बांधवांना मिळतोय दिलासा : दादाजी भुसे
दुकानातल्या आईस्क्रीमच्या फ्रीजरचा शॉक लागून 4 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू.

लातूर प्रतिनिधी – ऑटोवर बनावट नंबरप्लेटचा वापर करुन फसवणूक केल्याची घटना लातूर शहरात घडली. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात ऑटोचालकाविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूर शहरात एक चालक (एम.एच. 24 ए.टी. 2209) हा नंबर प्लेट टाकून शहरात फिरत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश कदम यांना मिळाली. या माहितीच्या आधारे तो ऑटो ताब्यात घेवून, चालक ऑटो चालक हरी श्रीरंग माळी (वय 51 रा. स्वराज नगर, पाखरसांगवी ता. लातूर) याला ताब्यात घेत चौकशी केली. ऑटोच्या पुढील बाजूस, डाव्या बाजूला ऑटो (एम.एच. 24 ए.टी. 2209) असा क्रमांक लिहिलेला आणि पाठीमागील बाजूस ऑटो (एम.एच. 24 ए.टी. 209) आणि उजव्या बाजूस ऑटो (एम.एच. 24 ए.टी. 220) असा क्रमांक लिहिल्याचे आढळून आले. त्याच्याकडील कागदपत्रांची पडताळणी केली. ताब्यातील चालकाने ई-चलान दंड पडला तरी मूळ ऑटो (एम.एच. 24 ए.टी. 2209) वर पडेल. या हेतूने क्रमांक टाकला असल्याचे सांगितले. या माध्यमातून त्यांनी शासनाची आणि ऑटोमालकाची (एम.एच. 24 ए.टी. 2209) फसवणूक केली. ऑटोवर पुढील बाजूस, डाव्या बाजूस (एम.एच. 24 ए.टी. 220) लिहून फसवणूक केली. मूळ ऑटो (एम.एच. 12 क्यू.आर. 5385) यांचे परमीट पुणे जिल्हा येथील असताना लातुरात ऑटो चालवून शासनाची फसवणूक केली. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन ऑटो चालक हरी श्रीरंग माळी याच्याविरोधात गुरनं. 405 / 2023 कलम 420 भादंविप्रमाणे, मोटार वाहन कायदा कलम 66 (1) / 192 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश कदम, सहायक पोलिस निरीक्षक प्रतिभा ठाकूर, पोहेकॉ. सुग्रीव नागरगोजे, मद्देवाड, घोगेर, चालक नागरगोजे, पोना. बिराजदार, पोकॉ. सय्यद यांच्या पथकाने केली.

COMMENTS