Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीने बैठक घ्याः आ. काळे

कोपरगांव/प्रतिनिधी : कोपरगाव मतदारसंघात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी मतदारसंघाची तातडीने आढावा

मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू
प्रियंका शिंदे यांना महिला लिडर बिझनेस पुरस्कार
अहमदनगर जिल्ह्यातील 3 लाख हेक्टरवरील पिके अडचणीत

कोपरगांव/प्रतिनिधी : कोपरगाव मतदारसंघात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी मतदारसंघाची तातडीने आढावा बैठक घ्या. अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांच्याकडे केली आहे.

पावसाळा सुरु होवून जवळपास तीन महिन्याचा कालावधी लोटला.अजूनही कोपरगाव मतदारसंघात अपेक्षित पर्जन्यमान झालेले नाही. यावर्षी पावसाने मतदारसंघाकडे पूर्णत: पाठ फिरविल्यामुळे खरीप हंगाम शेतकर्‍यांच्या हातातून गेल्यात जमा आहे. संपूर्ण मतदारसंघामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे. भूगर्भातील पाणी पातळी खालावल्यामुळे विहिरींचे पाणी देखील कमी झाले आहेत. त्यामुळे जे पाणी उपलब्ध आहेत त्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग होत आहे. येत्या काळात जर पाऊस झालाच नाही तर भीषण पाणीटंचाई बरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चार्‍यांचा देखील मोठा गंभीर प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यामुळे त्याबाबत योग्य त्या उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. त्याची अंमलबजावणी देखील प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. सर्व शेतकर्‍यांना लवकरात लवकर पिक विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे यंत्रणा राबविणे गरजेचे आहे. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे चारापिकांचे देखील नुकसान झाले असून स्वाभाविकपणे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकर्‍यांवर आपले पशुधन विकून टाकण्याची वेळ येते. शेतकरी आणि शेतमजूर यांच्या उत्पन्नाचा स्रोत थांबल्यास याबाबत काय उपाययोजना करायच्या याबाबत देखील चर्चा होणे गरजेचे आहे. तसेच पाण्याच्या नैसर्गिक स्रोतापासून जलसमृद्धी कशी साधता येईल. याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे असून, त्यासाठी जलयुक्त शिवारांच्या कामांचा आढावा घेणे क्रमप्राप्त आहे. त्याबाबत देखील भविष्यातील उपाययोजना करणे गरजेचे आहे. ब्रिटिश काळापासून कोपरगाव मतदारसंघातील 16 गावे खरीप व 63 गावे रब्बी ठरवण्यात आली आहेत. परंतु मतदारसंघातील सर्वच गावात खरीप हंगामात बाजरी,मका, कापूस, तूर, सोयाबीन,भुईमुग, कांदा आदी पिके घेतली जात असून, सर्वच गावांची नोंद खरीपाची होणे गरजेचे आहे. त्याबाबत देखील निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच कोपरगाव नगरपरिषद व महसूल विभागाच्या टंचाईबाबत करावयाच्या उपाय योजना तातडीने राबविण्यासाठी टंचाई आढावा बैठक घेवून त्यावर योग्य त्या उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. त्यासाठी दुष्काळाच्या उपाययोजना करण्यासाठी ज्या विभागांचा समावेश होतो अशा सर्व विभागांची कोपरगाव मतदार संघाची आढावा बैठक घ्यावी. अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांच्याकडे केली आहे.

COMMENTS