Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुल गांधींवर अर्बन नक्षलवादाचा प्रभाव : फडणवीस यांचा गंभीर आरोप

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतांना दिसून येत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी

ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळेच हवे
राजुरीत मजुराचा संशयास्पद मृत्यू,
तांदळेश्‍वर विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतांना दिसून येत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी काँगे्रस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करतांना राहुल गांधी यांच्या भारत जोडो या समुहातील अनेक संघटना अतिशय टोकाच्या डाव्या विचारांच्या असल्याचा हल्लाबोल केला. या संघटनांनी ध्येय धोरणे पाहिली, त्यांची कामाची पद्धत पाहिली तर त्या अराजकता पसरवत असल्याचे स्पष्ट असून, त्यातून राहुल गांधींवर अर्बन नक्षलवादाचा प्रभाव असल्याची घणाघाती टीका फडणवीस यांनी केली आहे.
फडणवीस बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. खरे म्हणजे संविधानाचा सन्मानच केला पाहिजे. पण लाल संविधान का? तुम्ही लाल पुस्तक दाखवून कुणाला इशारा देत आहात? संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर आणि अराजकतावादाचा अर्थ असतो डिसऑर्डर. तुम्ही अराजक पसरवत आहात. त्यामुळे संविधान व भारत जोडोच्या नावाखाली अराजकता पसवणार्‍या लोकांना एकत्र करून समाजात विद्वेष आणि अराजकता तयार करण्याचे काम याठिकाणी होत आहे. संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता पसरवणार्‍यांना एकत्र करून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. अर्बन नक्षलवाद हा यापेक्षा वेगळा नाही. अर्बन नक्षलवादाचा अर्थ असा आहे की, लोकांची मने प्रदूषित व कलुषित करायची. त्यांच्यामध्ये अराजकतेचे रोपण करायचे. जेणेकरून देशातल्या ज्या संस्था आहेत, देशातल्या ज्या व्यवस्था आहे, त्याच्यावरून त्यांचा विश्‍वास उडेल आणि कुठेतरी या देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल. हीच अराजकता पसरवण्याचे काम राहुल गांधी यांच्यामुळे देशात होत आहे आणि मी त्याच्यावरच बोललो आहे, असे फडणवीस म्हणाले.

लाल संविधान कशासाठी?
कोल्हापूरमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भारत जोडा असा समूह करण्यात आला आहे. ज्यामध्ये अनेक संघटना सामील झाल्या आहेत. ज्या संघटना अतिशय डाव्या विचाराच्या आहेत. त्यांची ध्येयधोरणे पाहता ती अराजकता पसरवणारी यंत्रणा आहे. ते पुढे म्हणाले की राहुल गांधी एक पुस्तक दाखवतात. संविधानाचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे, मग लाल संविधान कशासाठी? अशी विचारणा फडणवीस यांनी केली. लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहेत? तुम्ही या माध्यमातून अराजकता पसरवत आहात. भारत जोडोच्या माध्यमातून अराजकता पसरवली जात आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

COMMENTS