मुंबई प्रतिनिधी- सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे.आजचं कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचं पाह
मुंबई प्रतिनिधी– सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे.आजचं कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके! अश्या घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. तर त्याचवेळी सत्ताधारी पक्षही तिथे उपस्थित होता. यावेळी गोंधळाचं वातावरण पाहायला मिळाले. यावेळी विरोधकांनी गाजर आणले होते. हे गाजर हाती घेत सरकारच्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे आज विधिमंडळ परिसरात सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी प्रचंड गोधळाचं वातावरण निर्माण झालं.
COMMENTS