Homeताज्या बातम्या

आगामी निवडणुका स्वबळावर कमळ चिन्हावर लढणार मात्र आघाडी नाही : डॉ. अतुल भोसले

कराड / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसह सर्वच निवडणुका भारतीय जनता पक्ष चिन्हावर लढणार आहे. कराड नगरपालिकेत

फडणवीसांना धमकीप्रकरणी खडाजंगी
नगरच्या बांधकाम व्यावसायिकास धमकी
OBC आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्याची भाजपची मागणी LOKNews24

कराड / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसह सर्वच निवडणुका भारतीय जनता पक्ष चिन्हावर लढणार आहे. कराड नगरपालिकेत 31 जागांवर कमळ चिन्हावर उमेदवार उभे राहतील, तेथे कोणाशीही आघाडी करणार नाही. तसेच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणूक लागल्यास तेथेही भाजपाचा उमेदवार उभा असेल, असे सातारा जिल्हा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी स्पष्ट केले. कराड येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आतापासून सर्वच ठिकाणी भाजप पक्ष वाढविण्यावर आमचा भर असणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात होणार्‍या सर्वच निवडणुका आमचा पक्ष कमळचिन्हावर निवडणूक लढेल. त्यानंतर सत्ता स्थापन करताना काय निर्णय घ्यायचा किंवा कोणासोबत आघाडी करायची तो प्रश्‍न त्या-त्यावेळी बघितला जाईल. मात्र, निवडणुका या स्वबळावर आणि पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जातील.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन करण्यात येईल. पक्ष वाढीच्या दृष्टीने जे आदेश पक्षाकडून तसेच पक्षश्रेष्ठीकडून येतील, त्यानुसार पुढील भूमिका आमची सातारा जिल्ह्यात असणार आहे. परंतू आम्ही निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी किंवा स्थानिक आघाड्यांशी आघाडी करणार नसल्याचे डॉ. अतुल भोसले यांनी स्पष्ट केले.

COMMENTS