Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवकाळी पावसाने हिरावला शेतकऱ्याचा तोंडाला आलेला घास 

जळगाव प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगांव तालुक्यातील अनेक गांवात आज रात्रीच्या वेळी अचानक अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे

राहुरी तहसीलवर मातंग समाजाचा आक्रोश मोर्चा
तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा : मंत्री जयकुमार रावल
बार्शीत गौतमी पाटील चा कार्यक्रम पोलिसांनी बंद पाडला

जळगाव प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगांव तालुक्यातील अनेक गांवात आज रात्रीच्या वेळी अचानक अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

       जळगाव जिल्ह्यातील पाचोरा व भडगांव दोन्ही तालुक्यातील अनेक गावात आज रात्रीच्या वेळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मात्र शेती पिकांचे नुकसान झाले आहे. पाचोरा तालुक्यातील बाळद, नगरदेवळा, वरखेडी, कुऱ्हाड आणि भडगांव तालुक्यातील कजगाव, भातखंडे आदी दोन्ही तालुक्यातील परिसरात अवकाळी पाऊसची सुरूवात झाली असुन या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

COMMENTS