देवळाली प्रवरा ः जोपर्यंत राजकिय पुढारी व पोलिस प्रशासन गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम बंद करत नाहीत. तोपर्यंत समाजातील गुन्हेगारी कमी होणार
देवळाली प्रवरा ः जोपर्यंत राजकिय पुढारी व पोलिस प्रशासन गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम बंद करत नाहीत. तोपर्यंत समाजातील गुन्हेगारी कमी होणार नाही. असे प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरी येथील वकिल दाम्पत्यांच्या हत्याकांड प्रकरणी आज वकिल बार असोसिएशन च्या वतीने मोर्चा व निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे बोलत होते.
राहुरी येथील वकिल संघटनेचे सदस्य अॅड. राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी अॅड मनीषा राजाराम आढाव यांचे 25 जानेवारी रोजी राहुरी न्यायालय परिसरातून अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची अत्यंत अमानुष व निर्घृनपणे हत्या केली. आणि त्यांच्या मृतदेहाला दगड बांधुन उंबरे येथील स्मशान भूमीतील विहीरीमध्ये टाकून दिले. या घटनेचा तपास सखोलपणे होणे आवश्यक आहे. कारण घटनेची व्याप्ती व गांभीर्य पहाता सदर घटनेचा तपास हा सी.आय. डी. च्या तपास यंत्रणे मार्फत व्हावा. आरोपीची नार्को टेस्ट करण्यात यावी. आरोपींना शिक्षा होण्यासाठी व खटला त्वरीत निकाली निघण्यासाठी सदरचा खटला जलदगती न्यायालयासमोर चालविण्यात यावा. अॅड. आढाव दांपत्यांचा मुलगा साई राजाराम आढाव व त्याची मावशी फिर्यादीस व त्यांचे कुटुंबास त्वरीत पोलीस संरक्षण देण्यात यावे. वकिलांवर होत असलेले हल्ले थांबविण्याचे उददेशाने वकिलांसाठी प्रोटेक्शन अॅक्ट मंजूर होणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने अॅडव्होकेट संरक्षण कायदा त्वरीत पारीत करावा. सर्व वकिलांना स्वसंरक्षणा करिता शस्त्र परवाना देण्यात यावा. तसेच वकिलांच्या कुटुंबियांचे हिताचे दृष्टीने आर्थिक मदत व्हावी, या हेतूने पंचवीस लाखाचे विमा संरक्षण प्रत्येक वकिलास शासना मार्फत मिळावे. अशी राज्यभरातील वकिल संघटनांची मागणी असून आरोपींना मरे पर्यंत फाशीची शिक्षा होणे गरजेचे आहे. असे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी अॅड. मिसाळ, अॅड. विष्णू ताके, अॅड. महेश शेडाळे, अॅड. बन्सी सातपूते, अॅड. नितीन विखे, अॅड. सदाशिव थोरात, अॅड. दादासाहेब शेळके, अॅड. अनुराधा येवले, अॅड. अनिता दिघे, अॅड. सुरेश लगड, अॅड. अशोक पाटील, अॅड. नरेश गुगळे, अॅड. सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी. आणि वकिल संरक्षण कायदा त्वरीत पारीत करावा. अशी एकमुखी मागणी केली. या प्रसंगी अहमदनगर जिल्ह्यातील 13 तालूक्यातील बार असोसिएशन च्या अध्यक्षा सह महिला व पुरुष वकिल शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS