Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तालुक्यासह जिल्हा राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू 

जळगाव प्रतिनिधी - चोपडा तालुक्यासह जिल्ह्यात राज्यात काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत असल्याने राज्यामध्ये ढगाळ वातावरण आणि त्या

दुष्काळाप्रती सरकारची अनास्था
सावधान! माळढोक पाठोपाठ लोकशाही संपवण्याचा डाव
तोट्यातील कंपन्यांकडून भाजपला दान

जळगाव प्रतिनिधी – चोपडा तालुक्यासह जिल्ह्यात राज्यात काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत असल्याने राज्यामध्ये ढगाळ वातावरण आणि त्याचा परिणामाने वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. या गारव्यामुळे थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर  पावसामुळे घरात एका कोपऱ्यात ठेवलेल्या छत्र्या आता नागरिक बाहेर काढू लागले आहेत. त्याचबरोबर थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मार्च महिना म्हटला तर कडक उन्हाचा पारा चढत असतो या दिवसांमध्ये आपण थंड पेय व झाडाखाली सावली शोधत असतो परंतु या अवकाळी पावसामुळे हा उन्हाळा आहे की पावसाळा का हिवाळा असे कोडे नागरिकांना पडत आहे. 

COMMENTS