Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवकाळी पावसाने भाज्या नासल्या, दरही घसरले

शेतकऱ्यांसोबत व्यापारीही संकटात

नवीमुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दिवसाला साडे तीनशे ते चारशे भाज्यांच्या गाड्यांची आवक होती. ती आता शंभरने कमी झाली आहे. अवका

सातारा जिल्ह्यात वळीवाच्या पावसाचा तडाखा
शहापूर फाट्यावर पकडला पाच किलो गांजा; एकास अटक; एक संशयित पसार
महाविकास आघाडीला स्वाभिमानी राम राम ठोकण्याच्या पवित्र्यात

नवीमुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दिवसाला साडे तीनशे ते चारशे भाज्यांच्या गाड्यांची आवक होती. ती आता शंभरने कमी झाली आहे. अवकाळी पावसाने भाज्या खराब झाल्याने गाड्यांची आवकही घटली आणि दरही घसरले, त्यात येणाऱ्या मालाला बाजारपेठ मिळत नसल्याने माल तसाच पडून राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांच नुकसान तर झालेच मात्र व्यापारीही संकटात सापडला आहे. या भाज्यांमध्ये पाले भाज्या खराब झाल्या असून, यात मेथी, कोथिंबीर सह इतर पालेभाज्यांचा समावेश आहे. त्यामुळे अवकाळी पावसाच्या तडाख्यात होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्याने सगळेच हवालदिल झाले आहेत.

COMMENTS